VIDEO : अनेकांच्या आहुतीनंतर अकोल्यात झाले कृषी विद्यापीठ !

By admin | Published: October 18, 2016 02:31 PM2016-10-18T14:31:18+5:302016-10-18T14:51:35+5:30

अकोल्यात कृषी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी आठ जणांनी प्राणांची आहुती दिली. अनेक जण जायबंदी झाले. त्यानंतर हे विद्यापीठ मिळाले

VIDEO: After the sacrifice of many, Eklavya Krishi Vidyapeeth! | VIDEO : अनेकांच्या आहुतीनंतर अकोल्यात झाले कृषी विद्यापीठ !

VIDEO : अनेकांच्या आहुतीनंतर अकोल्यात झाले कृषी विद्यापीठ !

Next
ऑनलाइन लोकमत
 
अकोला, दि. १८ - अकोल्यात कृषी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी आठ जणांनी प्राणांची आहुती दिली. अनेक जण जायबंदी झाले. त्यानंतर हे विद्यापीठ मिळाले. याच दिनाचे पर्व साधून  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विद्यापीठाच्यावतीने विदर्भातील शेतक-यांसाठी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले नवे वाण, तंत्रज्ञान बघण्यासाठी खुले केले जाते. यावर्षीही  १८ ते २० आॅक्टोबरपर्यंत शेतक-यांसाठी तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन  अकोला येथे करण्यात आले आहे.या शिवार फेरीचे उदघाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. रविप्रकाश दाणी यांच्याहस्ते करण्यात आले.
  राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आयोजित या शिवार फेरीचा सर्वांना फायदा घेता यावा, याकरिता जिल्हानिहाय कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. यामध्ये  १८ आॅक्टोबर रोजी बुलडाणा, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्हा, १९ आॅक्टोबर रोजी वाशिम, अमरावती, यवतमाळ व नागपूर तर  २० आॅक्टोबर रोजी अकोला, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील शेतक-यांकरिता  
शिवारफेरीत विविध तंत्रज्ञान माहितीसाठी खुले करण्यात आले आहे. कृषी शाास्त्रज्ञ शेतकºयांना याची माहिती देणार आहेत.
 बुलडाणा,वर्धा,गोंदिया व भंडारा जिल्हयातील शेकडो शेतक-यांनी आज कृषी विद्यापीठाचे नवे तंत्रज्ञान जाणून घेतले. 
 
 कृषी विद्यापीठ स्थापना दिवसानिमित्त शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले असून, शेतकरी बंधंूनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, या शिवार फेरीत शेतीसंबंधी तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे.
-डॉ. प्रदीप इंगोले, संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
 
 

Web Title: VIDEO: After the sacrifice of many, Eklavya Krishi Vidyapeeth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.