VIDEO : अकोल्यात पोलिस कर्मचा-यांसोबत आगळी-वेगळी भाउबीज
By admin | Published: November 1, 2016 03:13 PM2016-11-01T15:13:33+5:302016-11-01T16:18:57+5:30
कोणताही सण असो किंवा महोत्सव यावेळी सामान्यांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी पोलिस कर्मचारी सतत कर्तव्य बजावितात.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 1 - कोणताही सण असो किंवा महोत्सव यावेळी सामान्यांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी पोलीस कर्मचारी सतत कर्तव्य बजावितात. त्यामुळे दुस-यांच्या आनंदात आनंद मानणारे पोलीसही कुठल्याच सण व महोत्सवाला घरी राहू शकत नाहीत. बंदोबस्तावर असलेल्या अशा पोलीस दादा आणि तार्इंसोबत पाटील वेलफेअर गृपद्वारे मंगळवारी पैसाळी येथे आगळी-वगळी भाऊबीज साजरी करण्यात आली.
गेल्या 22 दिवसांपासून पैसाळी या खेडेगावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचा-यांसोबत पाटील वेलफेअर गृपने दिवाळी आणि भाऊबीज सण अनोख्या पद्धतीने साजरे केले. यावेळी पाटील गृपच्या महिलांनी पोलीस दादांना ओवाळून भाऊबीजेची भेट दिली तर महिला पोलीस कर्मचा-यांनी पाटील गृपच्या सदस्यांना ओवाळून भाऊबीज साजरी केली. यावेेळी पोलीस दादा आणि ताईंना फराळदेखील वाटण्यात आला.या कार्यक्रमाला अकोलेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.