video : अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या पारितोषिकांचे अनावरण

By Admin | Published: January 4, 2017 08:00 PM2017-01-04T20:00:37+5:302017-01-04T20:01:45+5:30

 ऑनलाइन लोकमत  अकोला, दि. 4 - लोकमत समूहातर्फे आयोजित लोकमत अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या ‘चॅम्पियन्स’ ट्रॉफीचे शहरातील मुख्याध्यापक तसे क्रीडा ...

Video: Akola Sports Festival's Prize Unveiled | video : अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या पारितोषिकांचे अनावरण

video : अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या पारितोषिकांचे अनावरण

Next

 ऑनलाइन लोकमत 

अकोला, दि. 4 - लोकमत समूहातर्फे आयोजित लोकमत अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या ‘चॅम्पियन्स’ ट्रॉफीचे शहरातील मुख्याध्यापक तसे क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी अनावरण करण्यात आले. ६ ते ८ जानेवारी दरम्यान  होणाऱ्या या स्पोर्ट्स फेस्टिव्हलमध्ये तब्बल १४ खेळांचा सहभाग असून, रंगतदार कार्यक्रमांनी शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता  उद्घाटन प्रभात किड्स डे बोर्डिंग येथे उद्घाटन सोहळा होत आहे. 
आंतरशालेय खेळाडूंकरिता अनोखी पर्वणी ठरणाºया इग्नाइट लर्निंग सेंटर प्रस्तुत तसेच प्रभात किडस्च्या सहकार्याने होत असलेल्या या अकोला स्पोर्ट्स फेस्टिव्हल-२०१७ मध्ये रायफल शुटिंग, बॅडमिटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, चेस, कबड्डी, ज्युदो, धनुर्विद्या, टेबल टेनिस, फुटबॉल, कुस्ती, अ‍‍ॅथलेटिक्स, कॅरम, हॉलिबॉल अशा १४ खेळांच्या स्पर्धा रंगणार असून, प्रत्येक सहभागी  खेळाडूस सहभाग प्रमाणपत्र व यशस्वी खेळाडूंना गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ मेडल देऊन गौरविण्यात येईल.यासोबतच ‘चॅम्पियन’ ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. या ट्रॉफीच्या अनावरण प्रसंगी प्रभात किडस्चे संचालक डॉ.गजानन नारे, न्यू इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक माधव मुन्शी, माऊंट कार्मेलचे अलफान्सो, जागृती विद्यालयाच्या सौ. आर.आर.मुळे, हिंदू ज्ञानपिठच्या गिरिजा गाडगीळ , स्कूल आॅफ स्कॉलरचे रामेश्वर राठाडे, सुफा इंग्लिशचे सैय्यद खान, सलेल शेख सलेर हुसेन, हॅपी अवरचे संतोष गजभिये, राजेश्वर कॉन्व्हेंटच्या  संध्या जैन, जागृती नाईट हायस्कूलचे विनायक देशमुख, बाबासाहेब उंटागळे हायस्कुलचे गजानन जोशी, मिलिंद विद्यालयाचे अमोल सिरसाट, कोठारी कॉन्व्हेंटच्या अंजली कडलस्कर यांचेसह लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, निवासी संपादक रवी टाले उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना मोठे व्यासपिठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम असल्याच्या भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केल्या.  
लेझर शो तसेच मार्च पास
शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात  ‘लेझर शो’चे विशेष आकर्षण राहणार आहे. सोबतच तात्या विंचू फेम सुप्रसिद्ध सत्यजित पाध्ये त्यांच्या गमतीदार शैलीत बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने मनोरंजन करणार आहेत. तसेच उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सर्व सहभागी शाळांची मार्च पास होणार आहे.  
सेल्फी पॉइंट अन् क्वीज शो 
तीन दिवस चालणाºया या स्पोटर््स फेस्टिव्हलमध्ये १४ खेळांसाठी जिल्हाभरातील हजारो स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धांसोबतच प्रेक्षकांना  रॉक शो, सेल्फी पॉइंट, क्वीज शो अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांची मजा घेता येणार
 

https://www.dailymotion.com/video/x844n89

Web Title: Video: Akola Sports Festival's Prize Unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.