VIDEO - माणुसकीच्या भिंतीवर आता अल्टरची सुविधा

By Admin | Published: November 17, 2016 04:44 PM2016-11-17T16:44:57+5:302016-11-17T16:44:57+5:30

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 17 :  भारत एक कदम चे अरविंद देठे यांनी पुढकार घेत सुरू केलेल्या माणसुकीच्या भिंतीपासून ...

VIDEO - Alter facility now on human wall | VIDEO - माणुसकीच्या भिंतीवर आता अल्टरची सुविधा

VIDEO - माणुसकीच्या भिंतीवर आता अल्टरची सुविधा

Next

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 :  भारत एक कदम चे अरविंद देठे यांनी पुढकार घेत सुरू केलेल्या माणसुकीच्या भिंतीपासून प्रेरणा घेत इतर शहरांमध्येही अशा भिंती उभ्या राहिल्यात. अकोल्यात . २० आॅक्टोबर रोजी ही माणुसकीची भिंत उभी राहिली अन् शेकडो सहृदयी दानशूरांनी मदतीचे हात पुढे केले हजारोंना या भिंतीमुळे हक्काचे कपडे मिळाले. आता याच भिंतीवर कपडे अल्टर करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. एखाद्या गरजवंताला कपडे पसंत आले परंतु ते कमी जास्त झाले असतील तर लगेचच तिथे असलेल्या टेलर कडून त्याला विनामुल्य कपडे मापात करून मिळणार आहेत.

राज्यात अकोल्यानंतर नागपूर, कोल्हापूर, बुलडाणा व जळगाव येथे अशा भिंती उभ्या राहिल्या आहेत मात्र अकोल्यातील माणुसकीच्या भिंतीवर देठे व त्यांचे सहकारी सुधाकर खुमकर यांनी सुरु केलेल्या या सुविधेमुळे गरजवंताला आवडलेले कपडे त्याच्याच मापाचेही करून देण्याची सोय झाली आहे. विशेष म्हणजे या भारत एक कदमने भारत एक कदम या सामाजिक संस्थेने अकोल्यात ह्यमाणुसकी देशासाठीह्ण हा उपक्रम राबवत बँकेत आलेल्या ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेसमोर मोठा मंडप उभारून, खुर्च्या टाकून, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे़

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एचडीफसी बँकेसमोर एक मोठा मंडप उभारून त्यात खुर्च्यांची व्यवस्था केली़ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे़ या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला टोकन देण्याची व्यवस्था भारत एक कदमने केली असून, बुधवारी सकाळपासून या टोकनचे वितरण करण्यात येईल़ टोकन क्रमांकानुसार ग्राहकांचा पुकारा झाल्यानंतर त्यांनीच बँकेच्या आत शिरायचे व बाकीच्यांनी मंडपात खुर्च्यांवर बसून राहायचे, अशी ही व्यवस्था आहे़

https://www.dailymotion.com/video/x844ifk

Web Title: VIDEO - Alter facility now on human wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.