VIDEO - अंबाबाई मंदिर परिसरात सापडले विरगळ
By Admin | Published: January 21, 2017 12:03 AM2017-01-21T00:03:00+5:302017-01-21T00:11:36+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 20 - कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरातील जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी विरगळ हे शिल्प ...
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 - कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरातील जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी विरगळ हे शिल्प सापडले. चार फुट उंचीचे हे विरगळ साधारण ११ व्या ते १२ व्या शतकातील आहे अशी माहिती मूर्ती अभ्यासकांनी दिली. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्याच्या पुढे जोतिबा रोड आहे. येथे गेल्या तीन दिवसांपासून गटारींच्या चॅनेलसाठी महापालिकेकडून खोदकाम सुरु आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडे चारच्या दरम्यान एस. ओ. कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर संतोष चव्हाण यांच्यासह कर्मचारी जेसीबीने खोदाई करताना आधी दीड फुट उंचीची नर्तकीची दुभंगलेले शिल्प सापडले. त्यानंतर पाईलखाली एक मोठे दगड लागले. या दगडाच्या आजुबाजूची माती काढून त्याखाली काही कर्मचाºयांनी हात घातल्यानंतर दगडावर कोरीम काम असल्याचे लक्षात आहे. त्यांनी दोरीच्या साह्याने दगड उचलण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही त्यामुळे जेबीसीच्या बकेटद्वारे हे शिल्प जमिनीतून बाहेर काढण्यात आले. परिसरातील नागरिकांनी हे शिल्प स्वच्छ केल्यानंतर ते वीरगळ असल्याचे लक्षात आले. या विरगळावर अत्यंत सुबक असे कोरीव काम असून ते अजूनही सुस्थितीत आहे. काळ्या पाषाणाचा पोत उत्तम आहे. हे शिल्प जोतिबा मंदिराला लागून ठेवण्यात आले आहे.
काय आहे विरगळ?
वीरगळ म्हणजे युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीराचे स्मृतीशिल्प. ११-१२ व्या शतकात युद्धात विरमरण आलेल्या असंख्य अनाम विरांच्या नावे घडवलेले असे शेकडो वीरगळ कोल्हापुरात सापडतात. कसबा बीड येथे नदीपात्रात असे वीरगळ घडवण्याचा कारखानाच होता. वीरगळ हा विराचा आणि सतीचा असे दोन प्रकारचे असतात. सापडलेला वीरगळ हा वीराचा असून त्याचे टप्पे खालून वर मोजतात. खालच्या पहिल्या टप्प्यात घोड्यावर बसून युद्ध करणारा वीर दर्शवला आहे. मधल्या टप्प्यात शहिद वीराला देवलोकात घेवून जाणाºया अप्सरा दाखवल्या आहेत. तर अखेरीला पुरोहिताच्या साक्षीने शंकराची पूजा करून वीर कैलासात सालोक्य पावला असे चित्रण या वीरगळात असते अशी माहिती मूर्ती अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.
https://www.dailymotion.com/video/x844orh