VIDEO: आंबोलीत भरला कारवी महोत्सव

By admin | Published: September 16, 2016 01:17 PM2016-09-16T13:17:53+5:302016-09-16T13:23:50+5:30

आंबोलीतील पठारावर सध्या कारवी बहरली असून फुलांचा उत्सव पाहण्यासाठी हजारो पर्यटक सध्या आंबोलीत गर्दी करत आहेत

VIDEO: Ambalit Bharla Karmi Festival | VIDEO: आंबोलीत भरला कारवी महोत्सव

VIDEO: आंबोलीत भरला कारवी महोत्सव

Next
>महेश सरनाईक / ऑनलाइन लोकमत
आंबोली (सिंधुदुर्ग), दि. 16 - आंबोली हे कोकणातील नयनरम्य हिलस्टेशन. जेमतेम चेरापुंजी एवढाच पाऊस येथे पडतो. येथील धबधबा तर पर्यटकांचे खास आर्कषण. त्यामुळे आंबोली पर्यटनस्थळी वर्षाचे बाराही महिने गर्दी आढळते. सदाहरीत असलेल्या आंबोलीत १८० हून अधिक रानफुले फुलतात. आंबोलीतील पठारावर सध्या कारवी बहरली आहे. 
 
कारवी ही ११ वर्षांनी बहरते. म्हणून तिला अकरा, बकरा किंवा टोपली अशा नावाने संबोधतात. गेल्या वर्षी काही भागात ती बहरली होती. यावर्षी उर्वरीत भागात बहरली आहे. या फूलांमधून मिळणारा मध औषध समजला जातो. या फुलांचा उत्सव पाहण्यासाठी हजारो पर्यटक सध्या आंबोलीत गर्दी करत आहेत. पुढील पंधरा दिवस कारवीचा बहारदार विना तिकीट एकदम फ्री पहायला मिळणार आहे. 

Web Title: VIDEO: Ambalit Bharla Karmi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.