VIDEO - अंबाबाईचा काकड सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 06:38 PM2016-11-04T18:38:58+5:302016-11-04T18:38:58+5:30
ऑनलाइन लोकमत/आदित्य वेल्हाळ कोल्हापूर, दि. 04 - करवीर निवासीनी अंबाबाई देवीचा काकड सोहळा दिवाळी ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत सुरू ...
ऑनलाइन लोकमत/आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर, दि. 04 - करवीर निवासीनी अंबाबाई देवीचा काकड सोहळा दिवाळी ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत सुरू असतो . या सोहळ्याचा आनंद लुटायचा असेल तर भाविकांना पहाटे ३ वाजता मंदिरात हजेरी लावावी लागते. पहाटे ३ वाजता घंटानादाबरोबरच हा सोहळा प्रारंभ होतो. यात पेटलेले काकड जामिनीपासून नव्वद फूटावरील मंदिराच्या मुख्य शिखरावर कशाचाही आधार न घेता सुबोध बापट व संजय कसबेकर हे देवीचे भक्त काकड ठेवतात. पूर्वीच्या काळी वीजेची सोय नव्हती त्यात हिवाळ्यात दाट धुके असल्याने बाहेरून आलेल्या भाविकांना मंदिर कोठे आहे हे कळण्यासाठी ही काकड ठेवण्याची प्रथा सुरू झाली . ती आज पर्यंत कायम आहे . या सोहळ्यानंतर मंदीर परिसरातील प्रत्येक मंदिरात दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा आहे .
https://www.dailymotion.com/video/x844grx