Video:...आणि मालकिणीसाठी श्वानाने दिला जीव

By Admin | Published: April 13, 2017 09:02 PM2017-04-13T21:02:37+5:302017-04-13T21:10:49+5:30

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 13 - भावासारखे प्रेम देणाºया मालकिणीचा जीव धोक्यात असल्याचे समजताच लकी नावाच्या श्वानाने हल्लेखोरावर झडप ...

Video: ... and the dogs offered by Swan to the owner | Video:...आणि मालकिणीसाठी श्वानाने दिला जीव

Video:...आणि मालकिणीसाठी श्वानाने दिला जीव

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - भावासारखे प्रेम देणाºया मालकिणीचा जीव धोक्यात असल्याचे समजताच लकी नावाच्या श्वानाने हल्लेखोरावर झडप घातली. यामध्ये श्वानाने स्वत:चा जीव गमावून मालकिणीसह अन्य एका तरुणीचा जीव वाचवून प्रामाणिकपणाचे जिवंत उदाहरण जगासमोर ठेवले आहे. सायन कोळीवाड्यातील ही घटना आहे.  
 
सायन कोळीवाड्यातील मक्कावाडीत सुमती तंगवेल देवेंद्रा (२८) ही तरुणी नशेखोर भाऊ आणि १३ महिन्याच्या लकी नावाच्या श्वानासोबत राहते. वडीलांच्या निधनापाठोपाठ दिड वर्षांपूर्वी आईचेही निधन झाले. आईच्या निधनाच्या अवघ्या काही महिन्यातच तिच्या दारात कोणीतरी श्वानाचे पिल्लू सोडून गेले. तिने त्याला घरात घेतले. त्याला मोठे केले. पाहता पाहता हा श्वानच तिच्यासाठी सर्वस्व ठरला. त्यामुळे तिने त्याचे नाव लकी ठेवले. परिसरात कोणी छेड जरी काढली तरी तो त्यांच्या अंगावर धाऊन येई. लक्कीमुळे तिच्याकडे कोणी वर नजर करुन पाहण्याची हिम्मत करत नसे. अनोळखी व्यक्तींना तर घरात थाराच नसे. सख्ख्या भावापेक्षा तो तिच्यासाठी सर्वस्व होता,आणि त्याच्यासाठी ती.
 
रविवारच्या रात्री झालेल्या घटनेनंतर सध्या सुमती एकटी पडली आहे. रविवारी रात्री शेजारी राहत असलेल्या रेसीचे तिच्या बहिणीच्या प्रियकर व्यंकटेश चेलप्पासोबत वाद झाला. याच भांडणात व्यंकटेशने रेसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चाकू घेउन तो तिच्यामागे लागला. रेसी बाहेर रस्त्यावर मदतीसाठी आली. यावेळी सुमतीच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने तिने तिच्या घरात धाव घेतली. सुमतिने तिच्या बचावासाठी व्यंकटेशला दारातच अडविले. व्यंकटेशने सुमतीला मारहाण करत त्या चाकूने तिच्यावर हल्ला करणार तोच लकीने त्याच्या अंगावर झडप घातली. आणि त्याला चावला. व्यंकटेशचा चाकूचा वार लकीने अंगावर घेतला. लकीला तेथेच व्यंकटेशने पळ काढला.
 
रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेल्या लकीला पाहून सुमतीही कोसळली. तिने स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात हलविले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.  सुमतीच्या तक्रारीवरुन अण्टॉपहील पोलिसांनी व्यंकटेशविरुद्ध ४२९ अनिमल अक्टनुसार गुन्हा दाखल केला. आणि त्याला अटक केली. यामध्ये त्याची जामिनावर सुटकाही झाली. 
 
मला न्याय मिळणार का?
आरोपीने आमच्यावरही हल्ला करण्याचे प्रयत्न  केले. यामध्ये माझा लकी माझ्यापासून हरपला. आरोपीविरुद्ध् आणखीन कडक कारवाई करणे गरजेचे होते. मात्र पोलीस टाळाटाळ करत आहे. त्यामुळे माझ्या लकीला न्याय मिळणार का? असा प्रश्न सुमतिने लोकमतशी बोलताना केला. 
 
पोलीस म्हणे श्वानासाठी लायसेन्स होते का?
रस्त्यावरच्या श्वानाला आश्रय दिला. त्याला माया लावली. त्यात त्याच्या हत्येनंतर मदत करण्याऐवजी पोलीस मलाच श्वानासाठीचा परवाना तुमच्याकडे आहे का? असा उलट सवाल विचारत असल्याची माहिती सुमतीनेदिली.
 
अधिक तपास सुरु...
याप्रकरणी ४२९ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणात अधिक तपास सुरु आहे. तपासात आणखीन काही आढळल्यास कलम वाढविण्यात येतील अशी माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.
 
 
https://www.dailymotion.com/video/x844vmu

Web Title: Video: ... and the dogs offered by Swan to the owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.