VIDEO - पाळीव प्राण्यांचे दिवाळी ‘व्हेकेशन ’
By Admin | Published: November 4, 2016 05:10 PM2016-11-04T17:10:34+5:302016-11-04T17:10:34+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 04 - कोण म्हणतं दिवाळीच्या सुट्टीचा आनंद केवळ माणसांनाच घेता येतो. यंदा घरातील पाळीव प्राणी ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 04 - कोण म्हणतं दिवाळीच्या सुट्टीचा आनंद केवळ माणसांनाच घेता येतो. यंदा घरातील पाळीव प्राणी सुध्दा दिवाळीच्या व्हेकेशनला गेले होते. हे ऐकून जरा आश्चर्य वाटेल. प्राणी कधी जातात का व्हेकेशनला ? पण हो गेले होते. पुण्यात त्यांच्यासाठी खास रिसॉर्ट सुरू करण्यात आल्यामुळे मालकांची चिंताच दूर झाली आहे.त्यामुळे पाळीव प्राण्यांनीही दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने व्हेकेशनचा आनंद लुटला.
‘ दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक कुटुंबाकडून दिवाळीचा आनंद लुटला जातो. घरातील माणसांबरोबरच पाळीव प्राणी सुध्दा कुटुंबातील एक सदस्यच असतो. पुण्यातील काही कुटुंबियांनी तर दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने पाळीव प्राण्यासाठी व्हेकेशन पॅकेज घेतले . शहरी धकादुकीच्या जीवनापासून दूर शांत वातावरणात सुरू झालेल्या रिसॉर्टमध्ये पाळीव प्राण्यांनी आठवडाभर वेळ घालवला. उच्च जातीचा कुत्रा, मांजर पाळणे ही अलिकडे फॅशनच झाली आहे. घरात नेहमी कोंडलेल्या स्थितीत राहण्यापेक्षा रिसॉर्टमध्ये मोकळ्या वातावरणात प्राणी हवा तसा वेळ घालवतात.
शहरात पाळीव प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट सुरू होत आहेत. काही कारणास्तव गावी जाण्याची वेळ आली तर पाळीव प्राण्यांना कुठे ठेवून जाणार असा प्रश्न निर्माण होतो. परंतु, प्राण्यांसाठी रिसॉर्ट सुरू झाल्याने हा प्रश्न सुटला आहे. दिवाळीत फटाक्यांचा आवाजमुळे प्राणी घाबरून जातात. त्यामुळे पुण्यातील पाळीव प्राण्यांच्या मालकांनी आपल्या कुत्र्या ,मांजरांना रिसॉटमध्ये ठेवणे पसंत केले. रिसॉर्टमध्ये मोकळी जागा असून स्वीमिंग पूल सारख्या सुविधा आहेत. प्रत्येक प्राण्याची काळजी घेण्यासाठी ठराविक व्यक्तींकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एका दिवसासाठी प्रत्येकी 500 ते 700 रुपये खर्च देण्यास प्राण्यांचे मालक तयार आहेत.
माझ्याकडे मिस्टी आणि लँबट या दोन डॉगी आहेत. मिस्टीला फटक्यांच्या आवाजामुळे खूप त्रास होतो. त्यामुळे दिवाळी निमित्त शहरापासून दूर शांत वातावरणात असलेल्या प्राण्यांच्या रिसॉटमध्ये सहा दिवस या दोघांना ठेवले होते.दोघांना एकमेकांची साथ असल्याने दोघेही रिसॉटमध्ये शांतपणे राहिले.
- रुतुजा गौतम ,पाळीव प्राण्याचे मालक
पाळीव प्राण्यांच्या मालकांना काही कामानिमित्त बाहेर जाण्याची वेळ आली तर ते आमच्या रिसॉर्टमध्ये प्राण्यांना ठेवून जातात. वडकी- फुरसुंगी जवळ आमचा रिसॉर्ट असून दिवाळीनिमित्त 40 हून अधिक प्राळीव प्राणी रिसॉटमध्ये दाखल झाले होते.प्राण्यांनीही दिवाळी व्हेकेशनचा आनंद घेतला.
- रोशन पोडवाल,पाळीव प्राण्याच्या रिसॉर्टचे चालक
https://www.dailymotion.com/video/x844gw6