VIDEO : केंद्रीय अर्थसंकल्पात देशहिताच्या विरोधी तरतूद - सीताराम येचुरी

By Admin | Published: March 27, 2017 12:41 AM2017-03-27T00:41:38+5:302017-03-27T00:57:29+5:30

ऑनलाइन लोकमत नवी मुंबई, दि. 27 - भाजपा सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आडून 40 इतर बिलांना ...

VIDEO: Anti-Constitutional provisions in the Union Budget - Sitaram Yechury | VIDEO : केंद्रीय अर्थसंकल्पात देशहिताच्या विरोधी तरतूद - सीताराम येचुरी

VIDEO : केंद्रीय अर्थसंकल्पात देशहिताच्या विरोधी तरतूद - सीताराम येचुरी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 27 - भाजपा सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आडून 40 इतर बिलांना मंजुरी घेण्याचे षड्यंत्र सुरू आहे. शेतक:यांकडे दुर्लक्ष करून भांडवलदारांना फायदा पोहचविला जात आहे. कार्पोरेट कंपन्यांना राजकीय पक्षांना निधी देण्याची साडेसात टक्केची अट व कोणाला किती पैसे दिले हे जाहीर करण्याची अट रद्द केली जात आहे. यामुळे भविष्यात मनी लाँड्रिंगला चालना मिळण्याची भीती असून राज्यसभेमध्ये अर्थसंकल्पातील देशहितविरोधातील तरतुदींविरोधात आवाज उठविणार असल्याचे मॉर्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी स्पष्ट केले आहे. 
नवी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत येचुरी यांनी भाजपा सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला छेद देवून सांप्रदायिक भावना भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी गडबड करण्यात आली आहे. अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार पूर्णपणो लोकसभेला आहे. राज्यसभेत फक्त चर्चा होवून सूचना दिल्या जावू शकतात. याचाच गैरफायदा घेवून सरकारने अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 प्रकारची इतर विधेयके घुसविली आहेत. ही विधेयके  स्वतंत्रपणो सादर केली असती तर राज्यसभेत बहुमत नसल्याने ती मंजूर करता आली नसती. यामुळेच अर्थसंकल्पाच्या अडून त्यांना मंजुरी देण्याचे षड्यंत्र सुरू आहे. सोमवारी राज्यसभेमध्ये हे षड्यंत्र हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कार्पोरेट कंपन्यांना  फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी उद्योजक राजकीय पक्षांना त्यांच्या फायद्यातील फक्त 7.50 टक्के रक्कम देवू शकत होते, परंतु आता ती अट रद्द करण्यात येणार आहे. पूर्वी कोणत्या पक्षाला किती निधी दिला ते जाहीर करावे लागत होते तीही अट रद्द केली आहे. यामुळे उद्योजक कोणालाही कितीही निधी देवू शकतात व तो कोणाला दिला हे सांगण्याचीही आवश्यकता नाही. यामुळे मोठय़ाप्रमाणात मनी लाँड्रिंग होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाच्या आडून देशविरोधी धोरणो राबविली जात असून तो मोठा राजकीय भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
बँकांचे करोडो रुपयांचे कर्ज बुडविणा:या उद्योजकांना कजर्माफी दिली जात आहे. परंतु आत्महत्या करणा:या शेतक:यांना कजर्माफी केली जात नसल्याने हे सरकार शेतकरी व कामगारविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीने शेतक:यांसाठी सुरू केलेला लढा स्वागतार्ह असल्याचेही येचुरी यांनी स्पष्ट केले. सरकार विरोधात सर्व कामगार व शेतकरी संघटना, सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणून मोठी आघाडी उभारण्यात येणार आहे. सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वाना संघटित करण्याचे काम सुरू असून पुढील काही महिन्यांत देशव्यापी आंदोलन उभे केले जाणार आहे. देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
 चौकट 
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मोठी गडबड करण्यात आली आहे. 
अर्थसंकल्प नामंजूर करण्याचा राज्यसभेला अधिकार नसल्याने त्यामध्ये 40 इतर बिलांचा समावेश केला आहे
उद्योजकांनी राजकीय पक्षांना 7.50 टक्केपेक्षा जास्त निधी देता येणार नाही ही अट काढण्याचे षड्यंत्र 
उद्योजकांनी कोणाला किती निधी दिला ते जाहीर करण्याची अटही काढण्याचा प्रयत्न 
अर्थसंकल्पामध्ये देशहिताच्या विरोधी तरतुदींचा समावेश 
भाजपा सरकार मनी लाँड्रिंगला चालना देत आहे
उद्योजकांना करोडो रुपयांची कजर्माफी देवून शेतकऱ्यांना कजर्माफी नाकारली जात आहे
देशाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा बदलून सांप्रदायिकवाद वाढविला जात आहे
सरकारविरोधात सर्वपक्षीय व संघटनांना एकत्र करून देशव्यापी आंदोलन उभारणार 
महाराष्ट्रातील शेतक:यांच्या आत्महत्या चिंताजनक, कजर्माफी दिलीच पाहिजे
काँग्रेस व राष्ट्रवादीने शेतक:यांसाठी घेतलेली भूमिका योग्य आहे
 
 
https://www.dailymotion.com/video/x844unx

Web Title: VIDEO: Anti-Constitutional provisions in the Union Budget - Sitaram Yechury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.