VIDEO : आर्ची, परशाचा मेणाचा पुतळा नागरिकांना पाहण्यासाठी खुला

By Admin | Published: May 1, 2017 11:55 AM2017-05-01T11:55:06+5:302017-05-01T16:05:23+5:30

ऑनलाइन लोकमत लोणावळा, दि. 1 - केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला "याड" लावणा-या "सैराट" सिनेमातील अभिनेत्री रिंकू राजगुरू ...

VIDEO: Archie, wax statue open to the public | VIDEO : आर्ची, परशाचा मेणाचा पुतळा नागरिकांना पाहण्यासाठी खुला

VIDEO : आर्ची, परशाचा मेणाचा पुतळा नागरिकांना पाहण्यासाठी खुला

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 1 - केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला "याड" लावणा-या "सैराट" सिनेमातील अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची), अभिनेता आकाश ठोसर(परशा) व सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मेणाचे पुतळे 1 मेपासून नागरिकांना खुले करण्यात आले आहे. लोणावळ्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये हे पुतळे ठेवण्यात आले आहेत. सोमवारी (1 मे) सकाळी 11:15 वाजता या पुतळ्याचे अनावरण वॅक्स म्युझियमचे डायरेक्टर सुभाष कंडलूर व  ही कलाकृती सादर करणारे कलाकार सुनिल कंडलूर यांच्या हस्ते करण्यात आले. सहा महिन्यांपासून हे पुतळे बनवण्याचे काम सुरू होते. अतिशय सुंदर व हुबेहुब असे हे पुतळे बनवण्यात आले आहेत.
 
भारतातील पहिले वॅक्स म्युझियम केरळ येथील वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी लोणावळ्यात सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम या नावाने सुरू केले आहे. गेल्या दहा वर्षात राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सिनेमा, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या शंभराहून अधिक सेलिब्रिटींचे हुबेहुब मेणाचे पुतळे या वॅक्स म्युझियममध्ये कलावंत सुनिल कंडलूर यांनी साकारले आहे. "सैराट" या सिनेमाच्या माध्यमातून सिनेरसिकांना याड लावणारे लोकप्रिय कलाकार आर्ची, परशा व नागराज यांचे पुतळे येथे हुबेहुब बनवण्यात आले आहेत. 
 
1 मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त व सलग सुट्टयांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने पुतळ्याचे अनावरण होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वप्रथम या पुतळ्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची चढाओढ सुरु होती. म्युझियममध्ये रिपाइंचे नेते रामदास आठवले, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, क्रिकेटर हरभजन सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण येत्या पंधरा दिवसांत करण्यात येणार असून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये बाहुबली या सुपरस्टार सिनेमातील तिन्ही कलाकारांचे पुतळे बनवण्यात येणार असल्याचे वॅक्स कलावंत सुनिल कंडलूर यांनी सांगितले. 
 
देवगडमध्ये नवीन वॅक्स म्युझियम
महाराष्ट्राची संस्कृती व महाराष्ट्रीयन कलाकार यांचा भरणा असलेले मराठमोळे नवीन वॅक्स म्युझियम येत्या 10 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वॅक्स म्युझियमचे डायरेक्टर सुभाष कंडलूर यांनी दिली.
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844wlq

Web Title: VIDEO: Archie, wax statue open to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.