VIDEO : गणेशोत्सवात अवतरले 'तारक मेहता'चे कलावंत !
By admin | Published: September 12, 2016 12:17 PM2016-09-12T12:17:38+5:302016-09-12T12:30:59+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेचा प्रभाव गणेशोत्सवावरही दिसून येतो.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेने घराघरात स्थान मिळविले आहे. या मालिकेतील अनेक पात्रांना त्यांच्या मुळ नावांनी कोणीच ओळखत नाही एवढी लोकप्रियता या मालिकेने मिळविली आहे त्यामुळे या मालिकेचा प्रभाव गणेशोत्सवावरही दिसून येतो. अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या रोज परिवर्तन गणेशोत्सव मंडळाने गणरायाचा देखावा गोकुलधाम सोसायटी मध्येच केला आहे. व या सोसायटीच्या प्रांगणात तारक मेहता, अंजली मेहता, आत्माराम तुकाराम भिडे, बापुजी, सोढीभाई, जेठालाल व दया अशा सर्व पात्रांच्या जोडया पुतळयाच्या रूपात मांडल्या आहेत. तारक मेहता का उल्टा चष्माचे शिर्षक गित गोकुलधाम मधील टप्पू सेना सध्या अकोलेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. विशेष म्हणजे तारक मेहता या मालिकेचा गौरव करणारे अमित लोककवी यांची कविता सुद्धा या ठिकाणी प्रकाशीत करून या मंडळाने आरास साकारली आहे.