VIDEO - दिव्यांगांच्या कलात्मकतेने भारावले कलाप्रेमी!

By admin | Published: October 19, 2016 05:19 PM2016-10-19T17:19:50+5:302016-10-19T17:19:50+5:30

इतरांपेक्षा स्वत:ला कमी न लेखता सामान्यांना लाजवेल, अशा कलाकृती साकारणारे दिव्यांग कलाकार...विविध वस्तूंच्या माध्यमातून मूर्त स्वरुपात अवतरलेले त्यांचे कलेवरील प्रभुत्व...

VIDEO - Artists thrilled by the artistry of flamingo! | VIDEO - दिव्यांगांच्या कलात्मकतेने भारावले कलाप्रेमी!

VIDEO - दिव्यांगांच्या कलात्मकतेने भारावले कलाप्रेमी!

Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19 -  इतरांपेक्षा स्वत:ला कमी न लेखता सामान्यांना लाजवेल, अशा कलाकृती साकारणारे दिव्यांग कलाकार...विविध वस्तूंच्या माध्यमातून मूर्त स्वरुपात अवतरलेले त्यांचे कलेवरील प्रभुत्व...कलात्मक वस्तू पाहून भारावलेले उपस्थित अन् कौतुकामुळे अभिमानाने चमकणारे त्यांचे डोळे, असे आगळेवेगळे चित्र प्रदर्शनात अनुभवायला मिळाले. निमित्त होते एरंडवणा येथील मनोहर मंगल कार्यालयात साथी संस्थेतर्फे अपंग व्यक्तींसाठी आयोजित ‘प्रोत्साहन २०१६’या कलाप्रदर्शनाचे. 
झेप रिहॅबीलीटेशन सेंटरच्या संस्थापिका नेत्रा तेंडुलकर आणि चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका नलिनी इनामदार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. यावेळी रेखा कानिटकर, रंजना आठल्ये, आबिदा खान, अमृता पटवर्धन, गीता पटवर्धन आदी उपस्थित होते. सुकांत कदम आणि पूजा मुनोत या विशेष मुलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 
नेत्रा तेंडुलकर म्हणाल्या, ‘गरजूंसाठी असलेल्या विशेष शाळांमधून त्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.’’ 
कानिटकर म्हणाल्या, सुरुवातीला केवळ १० संस्था आणि १० अपंग व्यक्तींनी प्रदर्शनात सहभाग घेतला.  अपंगांना अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. परंतु, त्यातून अर्थाजन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यांची ही गरज साथीने ओळखून त्यांना मदत करण्याचे ठरवले.’
यावर्षी अबीर,उडान,जीवनज्योत मंडळ, प्रिझम, अंकुर विद्या मंदिर, शिडीसाईबाबा अंध महिलाश्रम, चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट, आकांक्षा रिहॅबीलीटेशन सेंटर नगर या संस्थांसह ३० पेक्षा अधिक अपंग व्यक्तींनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दिनांक २० आॅक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. गीता पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
 
- दिवाळीसाठी आकर्षक आकाशकंदिलांपासून ते विविधरंगी पणत्या, नक्षीकाम केलेल्या कापडी पिशव्या ते भेटकार्डापर्यंत आणि विविध प्रकारच्या फराळाच्या पदार्थांपासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत अपंग व विशेष व्यक्तिंनी साकारलेल्या वस्तूंच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देत पुणेकरांनी भरभरुन दाद दिली. कागदापासून तयार केलेले दागिने, तोरण, बाटलीच्याा बुडापासून तयार केलेल्या पणत्या, नेमप्लेट, कॅलेंडर, वॉलपीस आदी वस्तू कलाप्रेमींना अधिक भावल्या.

 

Web Title: VIDEO - Artists thrilled by the artistry of flamingo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.