VIDEO : छट पूजेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अश्लिल ठुमके
By Admin | Published: November 7, 2016 12:16 PM2016-11-07T12:16:47+5:302016-11-07T12:22:27+5:30
ऑनलाइन लोकमत वसई, दि. 7 - नालासोपा-यामध्ये रविवारी छट पूजेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अश्लिलतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले. मोरेगाव ...
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 7 - नालासोपा-यामध्ये रविवारी छट पूजेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अश्लिलतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले. मोरेगाव परिसरात हिंदी भाषिक विकास मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
एकीकडे स्टेजसमोर थोर पुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या, आणि दुसरीकडे याचठिकाणी तीन ते चार महिला हिंदी आणि भोजपुरी गाण्यांवर अश्लिल हावभाव करत डान्स करत होत्या. एवढेच नाही तर कार्यक्रमात तृतीय पंथियांनादेखील नाचवण्यात आले. मनोरंजनाच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत केवळ अश्लिलपणा सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.
धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब म्हणजे, या कार्यक्रमात लहान मुलांनाही नाचवण्यात आले. छट पूजेला देवीची पूजा करतात, मात्र या परंपरेचा, संस्कृतीचा त्यांना विसर पडला का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हा सर्व अश्लिलपणा येथील स्थानिक नगरसेवकाच्यादेखत सुरू होता. मात्र यावर लोकप्रतिनिधींनी जराही आक्षेप नोंदवावा असे वाटले नाही.
https://www.dailymotion.com/video/x844h55