VIDEO - कपाशीवर लाल्याचे आक्रमण, शेतकरी संकटात
By Admin | Published: November 1, 2016 09:23 PM2016-11-01T21:23:08+5:302016-11-01T21:23:08+5:30
गतवर्षीचा दुष्काळ अनुभवल्यानंतर यंदा विदर्भातील पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. परंतु मूग, सोयाबिनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी खचला.
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 01 - गतवर्षीचा दुष्काळ अनुभवल्यानंतर यंदा विदर्भातील पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. परंतु मूग, सोयाबिनला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी खचला. कपाशी पिकावर त्याची भिस्त होती. परंतु कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. लाल्या रोगामुळे प-हाटीवरील पाने आणि बोंडांची गळती सुरू आहेत. प-हाटी पिवळी पडून वाळू लागली आहे.
मूग, सोयाबिन, तूर आणि कपाशी हे अकोला जिल्ह्यातील शेतक-यांची मुख्य पिके. गतवर्षी दुष्काळामुळे पिक हातचे गेले. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने, शेते पिकांनी डोलू लागली. शेतकºयांना मूगाचे, सोयाबिनचे उत्पादन समाधानकारक झाले. परंतु मूग, सोयाबिनला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला. मगू, सोयाबिन विकायचे की नाही. याचा विचार करू लागला. परंतु ज्या शेतकºयांना पैशांची आंत्यत्यिक गरज होती. त्या शेतकरी बांधवांनी कमी भावामध्येही मूग, सोयाबिन विकून टाकले. मूग, सोयाबिनला योग्य मिळाला नाही, परंतु कपाशी तरी साथ देईल. अशी शेतकºयाला आशा वाटू लागली. परंतु कपाशीचे पिकही सध्या अंग टाकू लागली आहे. अकोला तालुक्यासह आकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर तालुक्यातील शेकडो गावांमधील कपाशी पिकावर लाल्याने रोगाने आक्रमण केले. लाल्या रोगामुळे कपाशीची पाने लाल पडून वाळू लागली आहेत आणि कपाशी बोंडे सुद्धा वाळून गळायला लागली आहेत. दिवाळीच्या दिवसामध्ये कापूस वेचणीला प्रारंभ होतो. कपाशीचे बोंडे फुटायला सुरूवात झाली असली तरी तिच्यावर लाल्याचे संकट आल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. शेतातील हिरवीगार पºहाटी काही दिवसांमध्येच पिवळी पडायला आहे. आकोट, तेल्हारा, अकोला तालुक्यातील अनेक कपाशीची शेते पिवळसर दिसायला लागली आहेत. कपाशीवर लाल्याचे आक्रमण कसे परतवून लावायचे, या चिंतेत शेतकरी पडला आहे.