VIDEO : नाशिकच्या सांधण व्हॅलीची पर्यटकांची भुरळ
By Admin | Published: January 11, 2017 01:30 PM2017-01-11T13:30:37+5:302017-01-11T14:44:52+5:30
ऑनलाइन लोकमत घोटी (नाशिक), दि. ११ - नाशिक, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी निसर्गाचा अतुलनीय ...
ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. ११ - नाशिक, नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगेच्या पायथ्याशी निसर्गाचा अतुलनीय चमत्कार असणाऱ्या आशिया खंडातील द्वितीय क्रमांकाच्या सांधण व्हॅलीकडे राज्यासह देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.
दोनशे ते तीनशे फूट भूगर्भात नैसर्गिक रित्या पडलेल्या दरीत दोरीच्या साहाय्याने उतरणे धाडसाचे काम आहे. देशभरातून येणारे हौशी पर्यटक,गिर्यारोहक रॅपलिंग ची अनुभूती या दरीत घेत आहेत.
घोटीपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या नगर जिल्ह्यातील साम्रद या उपेक्षित गावाचे नाव संपूर्ण जगात पोहचविणारी सांधण दरी. नैसर्गिक रित्या भूगर्भात भेद होऊन सुमारे दोनशे ते तीनशे फूट खोल व एक ते दीड किलोमीटर लांब अशी दरी काही हौशी पर्यटकांच्या नजरेला पडली.त्यानंतर या दरीमध्ये धाडसी रॅपलिंग करण्यासाठी देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. त्यानंतर पर्यटकांची रीघ मोठ्या प्रमाणात वाढली.
स्थानिकांना रोजगार उपलब्ध
दरम्यान गेली अनेक वर्षांपासून उपेक्षित आणि दुर्लक्षित असणाऱ्या या भागातील अनेक गावांतील शेकडो युवकांना या व्हॅलीमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
कसे पोहचायचे
सांधण व्हॅलीला जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील घोटीपासून भंडारदऱ्याला जावे लागते तिथून वीस किलोमीटर अंतरावर साम्रद हे गाव आहे. या गावालगतच सांधण व्हॅली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844nty