VIDEO : दहा वर्षापासून दिव्यांग तरूणाला मदतीची प्रतीक्षा !
By Admin | Published: August 26, 2016 07:43 PM2016-08-26T19:43:33+5:302016-08-26T19:43:33+5:30
मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई या दाम्पत्यासमोर पडला
>- अमोल तांदळे
बीड, दि. 26 - मुलाला जन्मत:च अपंगत्व, नशिबी अठरा विश्वे दारिद्र्य, चार-साडेचार एकर कोरडवाहू जमीन यातच तीन मुलांचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न रेवणनाथ व सीताबाई या दाम्पत्यासमोर पडला आहे. मुलगा एकनाथ जन्मत:च दिव्यांग असल्याने त्याच्या संगोपनाची जबाबदारी या दाम्पत्यावरच आहे.
बीड तालुक्यातील चौसाळाजवळील ६० ते ७० उंबºयाचे गाव असलेल्या धोत्रा येथील दिव्यांग एकनाथची ही व्यथा आहे. २००५ दरम्यान संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग एकनाथला लाभ मिळावा यासाठी सीताबाई व रेवणनाथ यांनी बीड तहसीलकडे अर्ज केला होता. त्यानंतर अनेक वेळा तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारले. मात्र, एकनाथला कवडीची मदत झाली नसल्याचे एकनाथची आई सीताबाई यांनी सांगितले.
रेवणनाथ व सीताबाई यांना तीन अपत्ये आहेत. एकनाथ हा सर्वांत मोठा, त्यानंतरच्या भारतने परिस्थितीअभावी शिक्षण सोडून दुकानावर कामास लागला. तर तिसरा बाळासाहेब शिक्षण घेत असतानाच शेतीकडे वळला आहे. दिव्यांग एकनाथला शासनाकडून मिळणाºया योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी अर्ज-विनंत्या करूनही कुठलाही लाभ त्यांना मिळाला नाही. आईला शेतात काम करण्याची इच्छा असूनही घरातील दिव्यांग एकनाथकडे लक्ष द्यावे लागत असल्यामुळे तीही हतबल आहे. एकीकडे अपंग नसलेले अपंगाच्या सवलती लाटत आहेत, तर दुसरीकडे एकनाथसारख्या खरे लाभार्थी त्यापासून वंचित आहेत.