VIDEO : दिवसाढवळ्या दहा लाखांची बॅग पळवली

By admin | Published: October 24, 2016 08:09 PM2016-10-24T20:09:25+5:302016-10-24T20:09:53+5:30

शहरातील उद्योग भवन परिसरात महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमीटेडच्या रोखपालाच्या हातातील दहा लाखांची बॅग मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावत पळ काढल्याची घटना

VIDEO: The bag of ten million bags in the day | VIDEO : दिवसाढवळ्या दहा लाखांची बॅग पळवली

VIDEO : दिवसाढवळ्या दहा लाखांची बॅग पळवली

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 24 - शहरातील उद्योग भवन परिसरात महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमीटेडच्या रोखपालाच्या हातातील दहा लाखांची बॅग मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावत पळ काढल्याची घटना सोमवारी दुपारी २.३७ मिनिटांनी घडली. या प्रकरणी चौघांविरुध्द शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शहरातील उद्योग भवन परिसरात असलेल्या महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स प्रा. लि. मध्ये रोखपाल म्हणून कार्यरत असलेले विवेक बनसोडे (४५) हे आपल्या कर्मचाºयांना दिवाळी बोनस रोखीने देण्यासाठी बँकेतून रोख दहा लाख रुपये घेवून एका बॅगमधून ते आपल्या कर्यालयासमोर आले. दरम्यान, कार्यालयासमोर कार्यालयासमोर मोटारसायकल पार्क करत असताना, शिवाजी चौकाच्या दिशेने जाणाºया मोटारसायकलवरील अज्ञात दोघांनी त्यांना तुळजापूरला जाणाºया रस्त्याची चौकशी केली. त्यांच्याशी संवाद साधत असताना शिवाजी चौकाकडून दुचाकीवर आलेल्या दोघांनी विवेक बनसोडे यांच्या हातात असलेली दहा लाखांची बॅग हिसकावत पळ काढला. काही कळायच्या आतच हे दोन्ही मोटारसायकलवरील चौघे चोरटे पसार झाले. दरम्यान, भांबवलेल्या विवेक बनसोडे यांनी आपल्या कर्मचाºयांना याबाबत माहिती दिली. फरार झालेल्या चोरट्यांचा पाठलाग करत शोध घेतला असता, ते सापडले नाहीत. या घटनेमुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विवेक बनसोडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी भेट देवून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
 
पाळत ठेवून पळविली बॅग -
रोखपाल विवेक बनसोडे हे सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बँकेत रोख रक्कम आणण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून दहा लाख रुपये काढून ते एका प्लॅस्टिकच्या पिशवित ठेवले. त्यानंतर ते उद्योगभवन परिसरातील आपल्या कार्यालयाकडे निघाले. दरम्यान, त्यांनी आपली मोटारसायकल कार्यालयसमोर पार्किंग केली. यावेळी डिक्कीतील ती बॅग बाहेर काढत असताना, शिवाजी चौकाकडे मोटार सायकलवरुन निघालेल्या दोघांनी तुळजापूरचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी त्यांच्या हातात असलेली बॅग दुसºया मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी हिसकावत पळ काढला. विवेक बनसोडे यांच्यावर पाळत ठेवूत ही बॅग पळविल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

Web Title: VIDEO: The bag of ten million bags in the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.