VIDEO : उन्हाळ्याची काहिली दूर करण्यासाठी "जयमाला"चे स्नान

By Admin | Published: April 24, 2017 04:45 PM2017-04-24T16:45:29+5:302017-04-24T19:16:58+5:30

ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 24 - पाटात पोहण्यासाठी जात होतो, अशी आठवण जवळपास बहुतांश लोकांकडे कायमस्वरूपी असते. शहराजवळून जाणाऱ्या ...

VIDEO: Bathing "Jaimala" to eliminate Summertime | VIDEO : उन्हाळ्याची काहिली दूर करण्यासाठी "जयमाला"चे स्नान

VIDEO : उन्हाळ्याची काहिली दूर करण्यासाठी "जयमाला"चे स्नान

Next
ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. 24 - पाटात पोहण्यासाठी जात होतो, अशी आठवण जवळपास बहुतांश लोकांकडे कायमस्वरूपी असते. शहराजवळून जाणाऱ्या पाटाला धरणातून पाणी सोडले की आजुबाजुची मुले हमखास त्या पाण्यात सूर लगावतात. त्याचप्रमाणे पाटावर आंघोळ करण्याचा मोह नाशिककरांना परिचित असलेल्या एका हत्तीणीलाही होत आहे. आपल्या माहुताला पुढे घालून जयमाला नावाची हत्तीण थेट डाव्या कालव्यावर निलगीरी बागेत सकाळ-संध्याकाळ आंघोळीसाठी येत आहे.
 
मूळ मालेगावच्या कालभैरव मंदिर येथील जयमाला सध्या नाशकात तपोवन परिसरात वास्तव्यास आहे. ‘कुल’ नाशिक यंदा चांगलेच ‘हॉट’ बनल्याने तिच्याही जीवाची लाहीलाही होत आहे. शहरी भागात डुबकी लगावण्यासाठी तिला पुरेशी जागाही उपलब्ध नसल्याने कुचंबना सहन करावी लागत असताना काही दिवसांपासून डावा कालवा वाहू लागल्याने दिवसाच्या पहिल्या आणि तीसºया प्रहरी माहूताकडून जयमालाला स्नान घातले जात असल्याने तीला दिलासा मिळत आहे.
 
 
 स्नान करीत असताना जयमाला आनंदाने सोंडेत पाणी घेऊन पाठीवर व डोक्यावर जोेराने फेक त असताना तीच्यासोबत ‘सेल्फी’ घेण्यासाठी परिसरातील युवकांची गर्दी जमते. 
 
https://www.dailymotion.com/video/x844w2x

Web Title: VIDEO: Bathing "Jaimala" to eliminate Summertime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.