VIDEO : मंत्री पार्कमध्ये साकारली ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची शाळा!
By Admin | Published: September 10, 2016 10:58 AM2016-09-10T10:58:46+5:302016-09-10T11:08:35+5:30
वाशिम शहरात साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सवामध्ये मंत्री पार्क येथील गणेश मंडळाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा देखावा साकारण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १० - वाशिम शहरात साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सवामध्ये मंत्री पार्क येथील गणेश मंडळाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा देखावा करुन जणू विविध प्रतिष्ठित, थोर विचारवंत व समाजसेविका महिलांची शाळा भरविल्याचे चित्र निर्माण केले आहे.
ग्रामीण पोलिस स्टेशनसमोर असलेल्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्यावतिने दरवर्षी विशेष काहीतरी आगळे-वेगळे नियोजन केल्या जाते. याहीवर्षी त्यांनी झोपडीवजा शाळा साकारुन त्या शाळेमध्ये मुलगी शिकली की काय फायदे होतात. मुलीचे शिक्षण किती महत्वाचे आहे या संदर्भात स्लोगन लावण्यात आले तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ च्या करण्यात आलेल्या देखाव्यात मदर तेरेसा, कल्पना चावला, लता मंगेशकर, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, किरण बेदी, सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, माता रमाई, झांशीची राणीसह विविध प्रतिष्ठित, थोर विचारवंत व समाजसेविका महिलांचे छायाचित्र लावण्यात आले आहेत. सदर चित्र लावतांना त्यावर करण्यात आलेल्या रोषणाईने रात्री ही शाळा पाहण्याचा वेगळाच आनंद आहे. वाशिम शहरात साकारण्यात आलेल्या देखाव्यामध्ये सदर देखावा सर्वोत्कृष्ट तसेच नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. यामध्ये दररोज नाविण्यपूर्ण करण्यासाठी मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.