VIDEO : ‘भ...भटकंतीचा’ - मुलांना प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकाचा लघुपट
By admin | Published: October 21, 2016 03:45 PM2016-10-21T15:45:40+5:302016-10-21T15:55:51+5:30
जंगलात, वीटभट्टीवर, शेतात काम करणा-या या मुलांमध्ये शिक्षणाचे बिज रूजावे यासाठी एका शिक्षकाने ‘ भ भटकंतीचा’ लघुपट तयार केला आहे.
Next
उद्धव फंगाळ, ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. २१ - मागासलेला व आदिवासींची वस्ती असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची संख्या लक्षणीय आहे. जंगलात, वीटभट्टीवर, शेतात काम करणा-या या मुलांमध्ये शिक्षणाचे बिज रूजावे, त्यांनी शिक्षणाची कास धरावी याकरिता एका शाळेवरील एका शिक्षकाने ‘ भ भटकंतीचा’ लघुपट तयार केला आहे. या लघूपटाला सोशल मिडीयावर उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
स्थानिक ध.दि.रहाटे शिक्षण संस्थेत राजश्री प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक विजय फंगाळ यांनी या लघुपटाची निर्मिती केली. जिल्ह्यातील मेहकर, लोणार, मलकापूर या तालुक्यांमधील काही गावे अविकसित आहेत. या गावांमध्ये शिक्षणाची सोय नाही, अजूनही एस. टी. पोहोचली नसून, आरोग्याच्या सोयी उपलब्ध नाहीत. या गावांमध्ये पालक मुलांना पोटाची खळगी
भरण्याकरिता दोन पैसे कसे मिळतील, यासाठी कामावर पाठवितात. त्यामुळे अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विजय फंगाळ यांनी लघूपट तयार केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष झोपड्यांमध्ये राहणाºया मुलांनीच भूमिका साकारली आहे. भ.... भटकंती या लघुपटाचे कौतुक करुन जिल्ह्यात सर्व शाळेत दाखविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी सांगितले. तसेच सदर लघूपट सोशल मिडीयावर मात्र धूम करीत आहे.