VIDEO: जयंत सावरकर यांना भावे गौरव पदक प्रदान

By Admin | Published: November 5, 2016 09:18 PM2016-11-05T21:18:56+5:302016-11-05T21:21:44+5:30

ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 5 - येथील अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ शनिवारी ज्येष्ठ ...

VIDEO: Bhain Vishav Medal awarded to Jayant Savarkar | VIDEO: जयंत सावरकर यांना भावे गौरव पदक प्रदान

VIDEO: जयंत सावरकर यांना भावे गौरव पदक प्रदान

Next
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 5 - येथील अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ शनिवारी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना शनिवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्याहस्ते हे पदक प्रदान करण्यात आले. नाट्यक्षेत्रातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी सावरकर यांनी कृतज्ञता व्यक्त करत शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमीची सेवा करणार असल्याची भावना व्यक्त केली.
 
दरवर्षी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात येते. यंदा हा पुरस्कार मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला होता. शनिवारी सायंकाळी भावे नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्याहस्ते सावरकर यांना पदक प्रदान करण्यात आले. यावेळी अभिनेते विघ्नेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना जयंत सावरकर म्हणाले की, या व्यवसायात कार्यरत असताना मिळालेले ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि संस्कारांचा उपयोग अभिनयात केल्याने सहजसुंदरता अनुभवता आली. परमेश्वराने जर पुढचा जन्म दिलाच, तर तो रंगभूमीची सेवा करण्यासाठीच द्यावा. या रंगभूमीने सर्वकाही दिल्याने शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यासाठीच कार्यरत राहणार आहे.
 
गवाणकर म्हणाले की, नाट्यक्षेत्रातील एकापेक्षा एक सरस आणि दर्जेदार कलाकार देणाºया सांगलीच्या मातीतच काहीतरी विशेष गुण आहेत. नाट्यक्षेत्रातील सर्वाेच्च मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार सावरकर यांना मिळाल्याने त्यांच्या आतापर्यंतच्या रंगभूमीवरील सेवेचा सन्मान झाला आहे.
अभिनेते विघ्नेश जोशी यांनी जयंत सावरकर यांची रंगभूमीवरील कारकीर्द आणि त्यांच्या अभिनय कौशल्याचा पट उलगडून दाखवला.
 
नाट्यविद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे, विनायक केळकर, निर्मला सावरकर, मेधा केळकर, व्ही. जे. ताम्हणकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, बीना साखरपे आदी उपस्थित होते.
{{{{dailymotion_video_id####x844h07}}}}

 
स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी
जयंत सावरकर म्हणाले की, नाट्य क्षेत्रात माझी ओळख ‘मामा पेंडसे यांचा जावई’ अशी होती. प्रत्येकवेळी मला याची जाणीव करून देण्यात येत असे. मात्र, मी रंगभूमीची सेवा करताना आलेल्या सर्व संधी स्वीकारत गेल्याने ‘मामा पेंडसे हे यांचे सासरे’ अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालो. निष्ठेने आणि आलेल्या प्रत्येक संधीचे माझ्यापरीने का होईना सोने केल्यानेच हा पुरस्कार मिळाला आहे. रंगमंचावर पुन्हा एकदा ‘एकच प्याला’ नाटक येत असून, यातील तळीरामाची भूमिका शक्यतो मीच करणार असून, विकृत आणि विद्रुप स्वरूपातील तळीराम मला दाखवायचा नाही.
 
गंगाराम गवाणकर यांच्याहस्ते जयंत सावरकर यांना यंदाचा भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. गौरव पदक, रोख अकरा हजार एकशे एक रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सावरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. 
 

Web Title: VIDEO: Bhain Vishav Medal awarded to Jayant Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.