VIDEO : बीबी का मकब-याचे अभिजात सौंदर्य लयास जाताना...

By Admin | Published: July 5, 2017 06:28 PM2017-07-05T18:28:53+5:302017-07-05T18:41:53+5:30

- मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत   औरंगाबाद, दि. 05 -  आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची ...

VIDEO: Bibi's mausoleum's elite beauty traps going ... | VIDEO : बीबी का मकब-याचे अभिजात सौंदर्य लयास जाताना...

VIDEO : बीबी का मकब-याचे अभिजात सौंदर्य लयास जाताना...

googlenewsNext
>- मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत
 
औरंगाबाद, दि. 05 -  आपल्या देशात इतिहासाचे केवळ गुणगान गायचे आणि त्याबद्दल बढाया मारण्याची वृत्ती आहे. त्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तूंच्या संवर्धनाची ना प्रशासनाला गरज वाटते, ना सामान्य नागरिकांना चिंता. त्यामुळेच तर ‘दख्खनचा ताज’ अशी बिरुदावली मिरविणा-या बीबी का मकब-याचे सौंदर्य लोप पावून तो विद्रूप अवस्थेतून आता एक शोकांतिका होऊ पाहत आहे. 
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या आग्राच्या ताज महालाची प्रतिकृती असली तरीही बीबी का मकब-याचे स्वतंत्र ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्यही आहेच. गेल्या ३५० वर्षांपासून जगाच्या पाठीवर औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करणा-या या अद्भुत स्थळाला भेट दिल्यावर त्याची दुरवस्था पाहून मात्र न राहून मनात येते की, कदाचित यामुळेच बीबी का मकब-याला ‘गरिबांचा ताज महाल’ हे विशेषण लागले असावे.
मकब-याच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच या शोकांतिकेची एक एक दुखरी बाजू समोर येऊ लागते. काळ्याशार पहाडाच्या पार्श्वभूमीवर एकेकाळी पांढरा शुभ्र स्फटिकासमान भासणारा मकबरा आता मात्र आसपास मनमोहक हिरवळ दाटूनही  तेजोभंग झाल्यागत उभा आहे. त्याची चमकदार शुभ्रता आता लोप पावली आहे. 
 
आज खरंच अशी परिस्थिती आहे?
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न
मकबरा निर्माण होऊन साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षे झाल्याने वास्तूची झीज होणे स्वाभाविक आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणेदेखील शक्य आहे. देशातील महत्त्वाच्या स्थळांपैकी एक असणाºया बीबी का मकबºयाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. मकबºयाच्या उंचवट्यावरील लाल दगडाचे कठडे अनेक ठिकाणी मोडले आहेत, तर काही चिरे कधीही पडतील, अशा धोकादायक स्थितीत आहेत. त्यावर कायमस्वरूपी इलाज करण्याऐवजी तात्पुरता डागडुजीचा उपाय केला जातो.  तारा आणि पाईपने कठडे बांधून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
इतिहासप्रेमींनी समोर येण्याची गरज
औरंगाबादचे मुख्य पर्यटन आकर्षण असणा-या बीबी का मकब-याच्या संवर्धनासाठी शहरवासीयांना एकत्र येण्याची गरज आहे. जर अशीच वाताहत सुरू राहणार असेल तर शहरातील इतर अनेक ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे मकबरादेखील एक शोकांतिका बनून राहील. ज्याप्रमाणे ताज महालाच्या संवर्धनासाठी, सौंदर्यकरणासाठी मेहनत घेतली जाते तसे मकबºयाच्या बाबतीत का प्रयत्न केले जात नाही? असा सवाल इतिहासप्रेमी विचारत आहेत. मकबºयाला गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी, पर्यटन विभाग, स्थानिक प्रशासन, महानगरपालिका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगाबादकरांनी आत्मपरीक्षण करून एकत्र येण्याची गरज आहे.
 
https://www.dailymotion.com/video/x84577e

Web Title: VIDEO: Bibi's mausoleum's elite beauty traps going ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.