VIDEO - विना हेल्मेट होतेय दुचाकीची ‘ड्रायव्हींग टेस्ट’

By Admin | Published: November 8, 2016 07:16 PM2016-11-08T19:16:13+5:302016-11-08T19:26:46+5:30

ऑनलाइन लोकमत/सचिन राऊत/प्रविण ठाकरे अकोला, दि. 08 -  दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी शिकाऊ वाहनचालकाकडून हेल्मेट घालूनच ‘ड्रायव्हींग टेस्ट’ ...

VIDEO - Bicycling 'driving test' without helmet | VIDEO - विना हेल्मेट होतेय दुचाकीची ‘ड्रायव्हींग टेस्ट’

VIDEO - विना हेल्मेट होतेय दुचाकीची ‘ड्रायव्हींग टेस्ट’

Next
ऑनलाइन लोकमत/सचिन राऊत/प्रविण ठाकरे
अकोला, दि. 08 -  दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी शिकाऊ वाहनचालकाकडून हेल्मेट घालूनच ‘ड्रायव्हींग टेस्ट’ घेणे सक्तीचे असतांना अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाने मात्र शिकाऊ वाहनचालकाकडून विना हेल्मेटच 'ड्रायव्हींग टेस्ट' घेण्यात येत असल्याचा पर्दाफाश लोकमतने मंगळवारी केला. वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी मोटर वाहन कायद्यानुसार परीवहन आयुक्तांनी नियम ठरवून दिले आहेत मात्र अकोला उपप्रादेशिक परीवहन खात्याने परीवहन आयुक्तांच्या नियमांना पायदळी तुडविल्याचे लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे.
दुचाकीच्या वाहन अपघात झाले असतांना ज्या दुचाकी चालकांनी हेल्मेट घातले आहे त्यांचे अपघातानंतर प्राण वाचल्याचे अनेक उदाहरनं समोर आली आहेत. परीवहन खात्याने याचा अभ्यास करून आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात दुचाकी वाहन चालकांना वाहन चालवितांना हेल्मेट घालने सक्तीचे करण्यात आले आहे. यासोबतच दुचाकी वाहन चालविण्याचा परवाणा देण्यासाठी वाहन चालकाची दुचाकी चालविण्याची चाचणी घेण्यात येते त्यावेळी वाहन चालकाने हेल्मेट घातलेले असने बंधनकारक आहे. मात्र अकोला उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून ही चाचणी थातुर-मातूर घेण्यात येत असल्याचे वास्तव आहे. दुचाकी चालकांची चाचणी घेतांना दुचाकी चालकाने हेल्मेट घातलेले नसतांनाही ही चाचणी घेण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर चाचणी घेणारा अधिकारी कार्यालयाच्या बाहेरीही येण्याची तसदी न घेता सदर वाहनचालकाला एकटयालाच चाचणी घेण्यासाठी पाठवून देण्यात येत असल्याचे या स्टींग आॅपरेशनमध्ये उघड झाले. यावरुन अकोला उपप्रादेशिक परीवहन विभागाकडून वहन चालकांच्या चाचण्या केवळ कागदोपत्री घेउनच त्यांना परवाणा देत असल्याचे समोर आले आहे.
 
दलालाच घेतात चाचणी
उपप्रादेशिक परीवहन खात्याचे काम करुन देण्यासाठी दलालांची साखळीच आहे. ही साखळी परवाणा देण्यापासून ते सर्वच काम करते, शिकाउ वाहन चालकाची चाचणीही दलालच घेत असल्याचे मंगळवारी लोकमतने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. वाहन चालकांचे दस्तावेज अर्धवट असतांनाही काही रुपयांमध्ये दलालांकडून परवाणा काढून देण्यात येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. 
 
अधिकारी कार्यालयात बसून
उपप्रादेशिक परीवहन खात्याकडून वाहन चालकांची चाचणी खडकी परिसरात घेण्यात आली. यावेळी येथील अधिकाºयाने जातीने हजर राहून वाहन चालकाची चाचणी घेण्याचा नियम आहे, मात्र येथील अधिकारी कार्यालयातच बसलेले असतांना एकटया वाहन चालकानेच जमीनीवर चुन्याने काढलेल्या ‘आठ’च्या आकडयातून दुचाकी चालविण्याची चाचणी पुर्ण केली. मात्र अधिकारी कार्यालयाच्या बाहेरही न येता त्यांनी सदर वाहन चालकास परवाणा दिला.
 
असा आहे नियम
मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार वाहन चालविण्याचा परवाणा देण्यासाठी घेण्यात येत असलेल्या चाचणीवेळी वाहन चालकाने हेल्मेट घालने सक्तीचे आहे. यासोबतच वाहन चालवितांनाही वाहन चालविणाºयाने व पाठीमागे बसणारा या दोघांनाही हेल्मेट घालने सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र चाचणी घेतांनाच या नियमांकडे पाठ दाखविण्यात येत असल्याचे वास्तव आहे. 
 
https://www.dailymotion.com/video/x844h8r

Web Title: VIDEO - Bicycling 'driving test' without helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.