VIDEO - ८ वी पास भाजप आमदाराने पत्नीला दिली ५ कोटींची लँबॉर्गिनी
By admin | Published: August 31, 2016 01:52 PM2016-08-31T13:52:29+5:302016-08-31T13:52:29+5:30
पत्नीने नवी कोरी पाच कोटींची आलिशान लँबॉर्गिनी कार रिक्षाला ठोकल्यामुळे मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता चर्चेत आले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
पत्नीने नवी कोरी पाच कोटींची आलिशान लँबॉर्गिनी कार रिक्षाला ठोकल्यामुळे मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता चर्चेत आले आहेत. पत्नीला इतकी महागडी कार गिफ्ट देणा-या आमदाराविषयी जाणून घ्या पाच गोष्टी.
१) भाजप आमदार नरेंद्र मेहता राजकारणी असण्याबरोबर उद्योजकही आहेत. त्यांची पहिली ओळख उद्योगपती अशी आहे. बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांची गुंतवणूक आहे.
२) २०१४ विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मेहता पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९९७ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मीरा-भाईंदर महापालिकेचे त्यांनी महापौरपदही भूषवले. २०१४ मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते.
३) नरेंद्र मेहता सेव्हन इलेव्हन ग्रुप ऑफ कंपनीचे ते संस्थापक आहेत. या ग्रुपचे १०० बेडचे रुग्णालय आहे.
आणखी वाचा
४) नरेंद्र मेहतांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले असून, त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात १८ कोटींची संपत्ती जाहीर केली होती.
५) नरेंद्र मेहतांसाठी वाद नवीन नाहीत. अलीकडेच शाळेत बेकायद बदल केले म्हणून महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्यावर बांधकाम प्रकल्पासाठी झाडे तोडल्याचाही आरोप झाला होता.
६) डिसेंबर २००२ मध्ये नरेंद्र मेहता यांना स्थानिक रहिवाशाकडून २० हजार रुपयांची लाच घेण्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली होती, ठाणे एसीबी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे.