VIDEO: तुरीचे मोजमाप संथगतीने, खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरच्या रांगा कायम!

By Admin | Published: May 23, 2017 12:10 PM2017-05-23T12:10:55+5:302017-05-23T12:10:55+5:30

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 23 - ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी सुरू करण्यात आल आहे. मात्र तुरीचे मोजमाप अत्यंत संथगतीने सुरू ...

VIDEO: Boom measurements slow down, tractor strings at shopping centers sustain! | VIDEO: तुरीचे मोजमाप संथगतीने, खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरच्या रांगा कायम!

VIDEO: तुरीचे मोजमाप संथगतीने, खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरच्या रांगा कायम!

Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 23 - ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी सुरू करण्यात आल आहे. मात्र तुरीचे मोजमाप अत्यंत संथगतीने सुरू असल्याने, जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत ट्रॅक्टरच्या रांगा कायम असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुरीचे मोजमाप होणार की नाही, असा प्रश्न तूर उत्पादक शेतक-यांमोर निर्माण झाला आहे.
 
हमी दराने नाफेडद्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे पंचनामे करून, शासनामार्फत तूर खरेदी सुरू करण्यात आली. दरम्यान, हमी दराने नाफेडद्वारे ३० मेपर्यंत तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनामार्फत जाहीर करण्यात आल्यानंतर, जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर तुरीची आवक वाढली. नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू करण्यात आली असली तरी, तुरीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जीवाची लाहीलाही करणाºया उन्हातान्हात खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी तूर उत्पादक शेतकºयांना ट्रॅक्टरजवळ बसून, तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबत प्रतीक्षा करावी लागत आहे.
 
https://www.dailymotion.com/video/x844zd8

Web Title: VIDEO: Boom measurements slow down, tractor strings at shopping centers sustain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.