VIDEO : महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे लोणावळ्यात दहन

By admin | Published: October 12, 2016 01:33 PM2016-10-12T13:33:56+5:302016-10-12T13:49:38+5:30

भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ लोणावळ्यात महादेव जानकरांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

VIDEO: Burning of the statue of Mahadev Jankar in Lonavla | VIDEO : महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे लोणावळ्यात दहन

VIDEO : महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे लोणावळ्यात दहन

Next
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १२ -  भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार व विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहर व नाणे मावळ राष्ट्रवादीच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे शिवाजी महाराज पुतळा चौकात दहन करण्यात आले. महादेव जाणकर यांनी भगवानगडावर भाषणात बारामती व राष्ट्रवादीच्या नेत्याबाबत अपशब्द वापरल्याचा यावेळी निषेध करत त्यांच्या पुतळ्याला चप्पलांचा हार घालत त्याला जोडे मारण्यात आले.
     यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, प्रांतीक सदस्य बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादीचे लोणावळा शहराध्यक्ष राजु बोराटी, खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तात्रय गोसावी, मनोज लहूळकर, नारायण पाळेकर, मावळ राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष रमेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष अमोल केदारी, किरण हुलावळे, राजु देवकर, जाकिर खलिफा,  सलिम मण्यार, महिलाध्यक्षा अरुणा लोखंडे, शिलाताई बनकर, शुभांगी हाळवे, सुरेश कडू, रमेश भांगरे, राजु मावकर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 

Web Title: VIDEO: Burning of the statue of Mahadev Jankar in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.