VIDEO- नाताळ उत्साहात साजरा

By Admin | Published: December 25, 2016 05:24 PM2016-12-25T17:24:36+5:302016-12-25T18:54:46+5:30

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 25 - सामूहिक प्रार्थना, पवित्र संदेशाचे श्रवण अशा पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच परस्परांना हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमसच्या ...

VIDEO-CHALLENGES Celebrate Christmas | VIDEO- नाताळ उत्साहात साजरा

VIDEO- नाताळ उत्साहात साजरा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 25 - सामूहिक प्रार्थना, पवित्र संदेशाचे श्रवण अशा पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच परस्परांना हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा, केक व भेटवस्तूंची देवाण-घेवाण, मिष्टान्नाचा आस्वाद अशा आनंदी वातावरणात ख्रिस्तजन्माचा सोहळा; अर्थात नाताळचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांच्या जन्माचा दिवस या दृष्टीने ख्रिस्त धर्मीयांसाठी नाताळचे महत्त्व अनन्यासाधारण असे आहे. नाताळनिमित्त रविवार २५ डिसेंबर रोजी शहरातील सर्व चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या. त्यानंतर उपस्थितांना धर्मगुरूंनी शांती, एकता, सामाजिक सलोखा, सेवा यांचा संदेश दिला.
प्रार्थना सभा व उपासना
ख्रिस्तजन्मानिमित्त रविवारी सकाळी १0 वाजता गांधी मार्गावरील अलायन्स मातृ चर्च, मध्यवर्ती बस्थानकाजवळील आॅल सेंट चर्च, सिंधी कॅम्पमधील बेथेल अलायन्स चर्च, बलोदे लेआऊटमधील सेव्हन्थ डे अ‍ॅडव्हॅन्टीस चर्च, ख्रिश्न कॉलनीतील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्च, अलायन्स कॉन्फरन्स सेंटर, अलायन्स लायब्ररी, माउंट कारमेलमधील रोमन कॅथॉलिक चर्च, न्यू इंडिया चर्च आॅफ गॉड, दि इंडियन पेन्टी कॉस्टल चर्चसह इतर चर्चमधून प्रार्थना सभांचे, तसेच उपासनेचे आयोजन करण्यात आले होते.

अलायन्स मातृ चर्चमध्ये पार पडलेल्या उपासनेदरम्यान ख्रिस्त बांधवांनी सहकुटुंब व वैयक्तिक गीते सादर करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा केला. यामध्ये लहान बालकांनी सादर केलेल्या गीताने वातावरण चैतन्यमय झाले होते. सभेला उपस्थित मंडळी सहकुटुंब, तसेच नवे कपडे परिधान करून चर्चमध्ये आल्याचे दिसत होते. प्रार्थनेनंतर परस्परांना शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती. एकमेकांना भेटल्याचा आणि सणाचा आनंद सर्वाच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी शुभेच्छांबरोबरच केक आणि बालचमूंसाठी चॉकलेट व मिठाई वितरित करण्यात आली. नाताळची शुभेच्छा पत्रे, सांताक्लॉजच्या लाल आकर्षक टोप्या, लाल अंगरखा, सांतासारख्या पांढऱ्या शुभ्र दाढी-मिशा, तसेच चॉकलेट, मेणबत्त्या, भेटीच्या वस्तू, फुगे, झिरमिळ्या, ख्रिसमस-ट्री आदी वस्तूंमुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. नाताळनिमित्त अलायन्स चर्च लायब्ररीसमोर व मध्यवर्ती बसस्थानकाजवळील आॅल सेंट चर्चमध्ये साकारण्यात आलेले ख्रिस्तजन्म सोहळ्याचे देखावे सर्वांना आकर्षित करीत होते.

https://www.dailymotion.com/video/x844mfb

Web Title: VIDEO-CHALLENGES Celebrate Christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.