VIDEO: टाइपरायटरवर चित्र काढणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 03:42 PM2018-05-10T15:42:50+5:302018-05-10T15:48:13+5:30

तुम्ही वॉटरकलर, पेन्सील, खडू वापरुन केलेली चित्रे पाहिली असतील परंतु मुंबईतल्या चंद्रकांत भिडेंनी टाइपरायटरचा वापर करुन हजारो चित्रे काढली आहेत. पन्नास वर्षे त्यांनी हा छंद जोपासला आहे.

VIDEO: Chandrakant Bhide drawing with typewriter | VIDEO: टाइपरायटरवर चित्र काढणारा अवलिया

VIDEO: टाइपरायटरवर चित्र काढणारा अवलिया

googlenewsNext

मुंबई- हजारो पोरांना नोकरी लावणाऱ्या या मशीनची जागा आता अडगळीत आहे; पण चंद्रकांत भिडे यांची बोटं गेली पन्नास वर्षे टायपिंग करत आहेत. टायपिंग करता करता त्यांनी टंकलेखन यंत्रावरच चित्र काढायला सुरुवात केली. असं चित्र काढायची कल्पना आलेले ते पहिलेच व्यक्ती असावेत. युनियन बँकेतून निवृत्त झालेल्या भिडे दादरमध्ये राहातात.

६७ सालापासून भिडे बॅंकेत नोकरी करत होते. खरं तर त्यांना जे.जे.मध्ये शिकायचं होतं. पण परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली आणि त्यांच्या हातात टाइपरायटर आला. पण आतला कलाकार गप्प बसलेला नव्हताच. नोकरीच्या ठिकाणीच त्यांनी टायपिंगमध्ये काही नवे प्रयोग केले. एकेदिवशी इंटरकॉमच्या फोन नंबरची यादी त्यांनी टेलिफोनच्या आकारातच टाइप केली. मग त्यांना सुचलं की फोन काढता येतो तर चित्र का नाही काढता येणार? त्यांनी धडाधड 'एक्स' (x)  हे  बटण वापरून गणपती काढायला सुरुवात केली.
सगळ्या रूपातले गणपती, अष्टविनायक झाल्यावर त्यांनी शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकर यांची चित्र काढायला सुरुवात केली. मग एक्ससारखी दुसऱ्या बटणांचा वापर करूनसुद्धा ते चित्र काढायला लागले. झालं. त्यांच्यातल्या कलाकाराला रोजच्या कामातूनच नवी वाट मिळाली.. भिडेंचे टाइपरायटरवर रोज नवे प्रयोग सुरू झाले. रोज नवे चित्र त्यांच्या मशीनमधून तयार होऊ लागले. एके दिवशी त्यांनी आर. के. लक्ष्मण यांचा कॉमनमॅनच मशीनवर काढला, कॉमनमॅनसारखा मारिओ मिरांडा यांचा मिस्टर गोडबोलेसुद्धा त्यांनी कागदावर उमटवला. एक वेगळ्या वाटेवरचा कलाकार म्हणून त्यांची ओळख व्हायला लागली. आर.के. लक्ष्मण, मिरांडा यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकी आणि कौतुकाची थाप दिल्यावर भिडे यांच्या चित्रांची प्रदर्शनही भरू लागली. चंद्रकात भिडे यांना या आगळ्यावेगळ्या कलेमुळे मोठमोठ्या साहित्यिक, कलावंत, लेखकांना भेटता आलं. त्यामुळे त्यांच्या या छंदाबद्दल आणि टाइपराईटरप्रती ते कृतज्ञता व्यक्त करतात.

Web Title: VIDEO: Chandrakant Bhide drawing with typewriter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.