VIDEO - प्रथम ब्रह्मोत्सवच्या रॅलीने चंद्रपूर दुमदुमले
By Admin | Published: December 24, 2016 09:31 PM2016-12-24T21:31:31+5:302016-12-24T21:35:33+5:30
ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 24 - श्री बालाजी मंदिर, नवीन दाताळा चंद्रपूर येथे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 24 - श्री बालाजी मंदिर, नवीन दाताळा चंद्रपूर येथे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून या चार दिवसीय महोत्सवाला प्रारंभ झाला. दरम्यान, आज शनिवारी या महोत्सवानिमित्त चंद्रपुरात रॅली काढण्यात आली. सायंकाळी काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे चंद्रपूर दुमदुमले.
श्री बालाजी मंदिर, नवीन दाताळा चंद्रपूर येथे भगवान बालाजीच्या मूर्तीची स्थापना होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या पवित्र पर्वाचे औचित्य साधून २३ डिसेंबर ते सोमवार २६ डिसेंबरपर्यंत प्रथम ब्रम्होत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या ब्रम्होत्सव कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा विश्वशांती व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ भगवान श्री बालाजीचा अभिषेक, सुख, समृद्धी, संपत्ती प्राप्तीसाठी ग्रहशांती व नवग्रह हवन लोकरक्षार्थ भगवान श्री बालाजी कल्याणोत्सव व श्री बालाजी अष्ठोत्तरशत (१०८) कलश श्रीराभिषेक (दुध) इत्यादी कार्यक्रम शत प्रतिष्ठापनाचार्य यज्ञ केसरी श्री श्री पराशर पट्टाभिरामाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत होत आहे.
दरम्यान, आज शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता येथील गांधी चौकातून रॅली काढण्यात आली. या रॅली दोन अश्वधारी, लेझीम पथक, पारंपारिक भजनदिंडी, बॅन्ड पथक व शेकडो नागरिक सहभागी झाले होते. गांधी चौकातून महात्मा गांधी मार्गाने जटपुरा गेट, रामनगर येथून रॅली मार्गक्रमण करीत श्री बालाजी मंदिरात रॅली विसर्जित करण्यात आली.
https://www.dailymotion.com/video/x844mci