VIDEO : वाशिममध्ये नगरपरिषदेची प्लास्टिक निर्मूलन मोहीम
By admin | Published: August 26, 2016 02:48 PM2016-08-26T14:48:47+5:302016-08-26T15:01:37+5:30
प्लास्टिक पिशव्या (कॅरिबॅग्ज) वापरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता वाशिम नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने शहरात प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २६ - प्लास्टिक पिशव्या (कॅरिबॅग्ज) वापरामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने शहरात प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. सदर मोहीम राबवितांना नगरपरिषदेचे कर्मचारी दुकानात जावून प्लास्टिक पिशव्या जप्त करीत असल्याने व्यापा-यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीव, मनुष्यावर परिणाम करतो. शहरामध्ये याचा वाढता वापर बघता ४० माईक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदारांवर कारवाइ्रची मोहीम हाती घेतली आहे.
आठवडी बाजाराच्या दिवशी मोठया प्रमाणात लघु व्यावसायिक दुकाने थाटतात . दर रविवारी विशेष मोहीमेसह दररोज गावातील दुकानदार, लघुव्यावसायिकांच्या जवळ जावून त्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो काय याची शहनिशा करणे व आढळल्यास त्याला ताकीद ेदण्याचे काम नगरपरिषदेचे कर्मचारी करीत आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºयांचे नाव व व्यवसाय लिहून त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. पुन्हा तो आढळल्यास त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात ज्या ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांशिवाय वस्तू घेवून जाणे जमत नाही अशांची मात्र मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. विनाकारण भानगडी नको म्हणून अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानात प्लास्टिक पिशव्या मिळत नाहीत असे फलक लावून दिले आहेत. तर काही जण आजही लपून पिशव्यांचा वापर करतांना दिसून येत आहेत. नगरपरिषदेने सुरु केलेल्या या धडक मोहीमेमुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापराचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी व जनावरांसाठी प्लास्टिक पिशव्या घातक असल्याने त्याचा वापर टाळावा असे आवाहनही नगरपरिषद आरोग्य विभागाच्यावतिने करण्यात येत आहे. या मोहीमेत स्वच्छता पर्यवेक्षक जितु बढेल, राजेश महाले, दशरथ मोहळे, नागपूरकर, लक्ष्मण बढेल यांच्यासह नगरपरिषद कर्मचाºयांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे.