VIDEO : छावा गणेशोत्सव मंडळावतीने व्यसनमुक्ती, बेटी पढोओबाबत जनजागृती

By admin | Published: September 9, 2016 10:55 AM2016-09-09T10:55:19+5:302016-09-09T11:07:40+5:30

वाशिममधील छावा गणेशोत्सव मंडळाच्यावतिने व्यसनमुक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओसह विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे.

VIDEO: Civic Ganeshotsav Mandalavya Drug Addiction, Beti Prabhodiya Janajagruti | VIDEO : छावा गणेशोत्सव मंडळावतीने व्यसनमुक्ती, बेटी पढोओबाबत जनजागृती

VIDEO : छावा गणेशोत्सव मंडळावतीने व्यसनमुक्ती, बेटी पढोओबाबत जनजागृती

Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ९ -  स्थानिक शिवाजी चौक स्थित छावा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने व्यसनमुक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओसह विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. 
वाशिम शहरात विविध गणेशोत्सव मंडळाने विविध विषयावर आधारित देखावे करुन यामधून जनजागृती केल्या जात आहे. छावा गणेशोत्सव मंडळाच्यावतिने स्थापन करण्यात आलेल्या गणेशोत्सव मंडळासमोर व्यसनमुक्तीवर आधारित भव्य असे फलक लावून तंबाखु, गुटखा, सिगारेट ओढणे, दारुसह ईतर नशा करणाºया पदार्थापासून होणारे दुष्परिणाम काय आहेत याचे छायाचित्रासहीत फलक लावण्यात आले आहेत. तसेच स्थापन करण्यात आलेल्या गणेशाच्या मुर्तीजवळ एक शाळकरी विद्यार्थीनीची मुर्ती बसवून ती शिक्षणाचे महत्व विषद करीत आहे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ संदर्भात लावण्यात आलेल्या फलकामध्ये विविध क्षेत्रामध्ये पुढे असलेल्या महिलांचे छायाचित्र लावून शिक्षण किती महत्वाचे आहे याबाबत दाखविण्यात आले आहे. पाणी हे जीवन आहे त्याचा जपून वापर करावा, जलसंवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा यासंदर्भातही जनजागृती करण्यात आली असून याबाबत एक रथ तयार केला आहे. तो गणेशोत्सव काळात संपूर्ण शहरात फिरुन या सर्व विषयंवर जनजागृती करणार आहे.
 
 

Web Title: VIDEO: Civic Ganeshotsav Mandalavya Drug Addiction, Beti Prabhodiya Janajagruti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.