VIDEO: भर पावसात ‘स्वच्छता दिंडी’
By admin | Published: October 2, 2016 05:07 PM2016-10-02T17:07:08+5:302016-10-02T17:07:08+5:30
‘भेटी गाठी -स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत रविवारी भर पावसात जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात स्वच्छता दिंडी
संतोष वानखडे / ऑनलाइऩ लोकमत
वाशिम, दि. 2 - ‘भेटी गाठी -स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत रविवारी भर पावसात जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात स्वच्छता दिंडी काढली. २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या दरम्यान गृहभेटी संवाद अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा २ आॅक्टोबरला गांधी जयंतीदिनी समारोप करण्यात आला.
रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात परतीचा पाऊस सुरू आहे. रविवारी दुपारी मंगरुळपीर तालुक्यातील जनुना येथे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या नेतृत्त्वात स्वच्छता कक्षाने भर पावसात स्वच्छता दिंडी काढली. यावेळी घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करून उघड्यावर शौचास जाऊ नका, असा संदेश देण्यात आला.
पाहा व्हिडीओ-