VIDEO : सफाई कर्मचारी झाला फार्मासिस्ट

By Admin | Published: March 9, 2017 10:08 PM2017-03-09T22:08:58+5:302017-03-09T22:08:58+5:30

 सुमेध वाघमारे/ ऑनलाइन लोकमत  नागपूर, दि. 9 -  चुकीच्या औषधांमुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो. एखादा अवयव कायमचा निकामी होऊ ...

VIDEO: Cleansing staff became pharmacist | VIDEO : सफाई कर्मचारी झाला फार्मासिस्ट

VIDEO : सफाई कर्मचारी झाला फार्मासिस्ट

Next

 सुमेध वाघमारे/ ऑनलाइन लोकमत 
नागपूर, दि. 9 -  चुकीच्या औषधांमुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो. एखादा अवयव कायमचा निकामी होऊ शकतो. म्हणूनच औषधांचे ज्ञान असलेल्या फार्मासिस्टची (औषध वितरक) नेमणूक केली जाते. परंतु मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलच्या त्वचा व गुप्त रोग विभागात दोन फार्मासिस्ट असताना एक सफाई कर्मचारी रुग्णांना औषधांचे वितरण करीत आहे. तब्बल अडीच वर्षांपासून हा कर्मचारी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. लोकमतच्या  स्टिंग आॅपरेशनमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
अन्न-वस्त्र-निवारा नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा. वाढत्या महागाईच्या काळात अनेकांना खासगी इस्पितळांत जाणे शक्य होत नाही म्हणूनच सामान्य व गरीब रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आशेचा किरण आहे. या रुग्णालयात विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथून रुग्ण येतात. यामुळे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) रुग्णांनी फुल्ल असते. टीबी वॉर्डाच्या परिसरात असलेल्या त्वचा व गुप्त रोग विभागातही रोज ३०० वर रुग्ण येतात. या विभागात नुकतेच काही अद्ययावत उपकरण उपलब्ध झाल्याने रुग्णांची गर्दी वाढलेली आहे. यामुळेच या विभागासाठी मनोज मानकर व विनोद सोनपिपरे नावाचे दोन फार्मासिस्ट दिले आहे. यातील एकाकडे दिलेल्या औषधांची रजिस्टरवर नोंदणी करणे तर दुसऱ्याकडे औषध वितरणाची जबाबदारी आहे. सकाळी ८ ते दुपारी २ अशी कामाची वेळ आहे. परंतु या दोन्ही फार्मासिस्टचा मनमानी कारभार सुरू आहे. हे दोघेही औषध वितरणाचे काम मुश्ताक पठाण या सफाई कर्मचाऱ्याकडे सोपवून कार्यालयीन वेळेत आपले खासगी काम करतात. सूत्रानुसार, अनेकवेळा पठाण यांच्याकडून चुकीचे औषध दिले गेले. याच्या तोंडी तक्रारीही झाल्या आहेत. तरीही हा प्रकार सर्रास सुरू आहे.

https://www.dailymotion.com/video/x844vea

Web Title: VIDEO: Cleansing staff became pharmacist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.