VIDEO - जिल्हाधिका-यांनी ‘हॉर्न’ वाजवून केला शौचालय बांधण्याचा जागर
By Admin | Published: November 11, 2016 03:51 PM2016-11-11T15:51:47+5:302016-11-11T15:51:47+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 11 - स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधणीस वेग आला असतानाही अनेकांनी अजुनही शौचालय बांधलेले ...
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 11 - स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शौचालय बांधणीस वेग आला असतानाही अनेकांनी अजुनही शौचालय बांधलेले नाहीत. ग्रामस्थांना शौचालयांचे महत्व पटविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जागर सुरु केला आहे. एका घरासमोर गाडी उभी होती, घरात कुलर होता, टीव्ही होता पण शौचालय नसल्याचे पाहून त्याच घरमालकाच्या गाडीवर बसून ‘हॉर्न’ वाजवित जिल्हाधिका-यांनी शौचालय बांधण्यासाठी जागर केला.
तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथे शौचालय बांधनीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत शुक्रवारी पोहचले. यावेळी जिल्हाधिकारी आपल्या सहका-यांसह थेट एका घरात गेले. तेथे एका वृद्ध महिलेसोबत संवाद साधत त्यांनी शौचालयाचे महत्व पटवून दिले. घराच्या अंगणात उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून जिल्हाधिका-यांनी कुटुंबासोबत संवाद साधला. घरात गाडी आहे...कुलर आहे...टीव्ही आहे... यासाठी पैसा सरकारने दिला का? नाही ना...तरी या सर्व वस्तू घेतल्या...शौचालय बांधण्यासाठी सरकार अनुदान देत आहे... तरी शौचालय बांधले जात नाही...त्यासाठी पंतप्रधान येतील का, असा सवाल जिल्हाधिका-यांनी केला. नातवंडांनी गाडी घेतली...त्यांनाच आता शौचालय बांधायला सांगा...असे जिल्हाधिका-यांनी या कुटुंबातील वृद्ध महिलेस सांगितले. किल्ले-बिल्ले बांधू नका...शौचालय बांधा...त्यामुळे आरोग्य नांदेल, असा सल्लाही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिला.