VIDEO : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसची निदर्शनं
By Admin | Published: June 9, 2017 01:25 PM2017-06-09T13:25:46+5:302017-06-09T13:26:13+5:30
ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 9 - मध्य प्रदेशात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना गुरुवारी ...
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 9 - मध्य प्रदेशात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना गुरुवारी (8 जून ) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली.
राहुल गांधींविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
गोळीबार करुन खून करणा-या, महाराष्ट्रातील शेतकरी व जनताविरोधी भाजपा सरकारचा निषेधार्थ आंदोलन,अशा आशयाचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
दरम्यान, श्रीमंतांचे १.५० लाख कोटींचे कर्ज मोदी माफ करू शकतात; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाहीत. शेतमालाला योग्य दर देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि बोनस देऊ शकत नाहीत. ते शेतकऱ्यांना फक्त गोळ्या देऊ शकतात, अशी टीका गुरुवारी राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात असताना केली होती.
निमच येथून पुढे गेल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखले. या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय जवान, जय किसान’, ‘राहुल गांधी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांच्यासह राजस्थान काँग्रेसचे प्रमुख सचिन पायलट, आमदार जयवर्धन सिंह आणि शेकडो कार्यकर्त्यांना या वेळी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना एका गेस्टहाउसमध्ये नेले.
राहुल यांच्यासोबत ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह व कमलनाथ हेही होते. राजस्थानच्या चित्तोडगढ जिल्ह्यातील दलिया गावातून मध्य प्रदेशमध्ये चालून प्रवेश केला. मध्य प्रदेशात प्रवेशापूर्वी राहुल गांधी हे चित्तोडगढ जिल्ह्यात निम्बाहेडपासून पाच ते सात किमी मोटारसायकलवरून गेले. सोबत २ हजार लोक, १५० वाहने होती.
- शेतकऱ्यांच्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जबाबदार आहेत.- राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष
https://www.dailymotion.com/video/x8452rf