VIDEO : भिवंडीतील एसटीचालक मृत्यू प्रकरण, ठाण्यात एसटी सेवा बंद
By Admin | Published: February 10, 2017 08:05 AM2017-02-10T08:05:11+5:302017-02-10T16:14:26+5:30
ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 10 - भिवंडी आगारात मुजोर रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटी चालकाचा झालेल्या मृत्यूप्रकरणी दुस-या दिवशीही एसटी कर्मचा-यांचे ...
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 10 - भिवंडी आगारात मुजोर रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटी चालकाचा झालेल्या मृत्यूप्रकरणी दुस-या दिवशीही एसटी कर्मचा-यांचे निषेध आंदोलन सुरूच आहे. ठाणे एसटी डेपोमध्ये एसटी कर्मचा-यांनी एसटी सेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात
आला आहे.
आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
भिवंडी आगारात बस नेताना धक्का लागल्याने मुजोर रिक्षाचालकांनी शिवीगाळ करत केलेल्या अमानुष मारहाणीत एसटी बसचालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी चारपर्यंत बंद पाळला. त्यामुळे एसटी वाहतूक विस्कळीत झाली होती.
ठाणे-भिवंडी ही शेवटची फेरी करून बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आगारात परतलेल्या बसचा आगाराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या रिक्षास धक्का लागला. रिक्षाचालकाने बसचालक प्रभाकर गायकवाड यांना शिवीगाळ केली. पण गायकवाड यांनी प्रवाशांना उतरवण्यासाठी बस आगारात नेली. वाहक पैसे जमा करण्यासाठी कार्यालयात गेला असताना गायकवाड हे रिक्षाचालकास जाब विचारण्यास गेले. पण तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
याची तक्रार देण्यासाठी गायकवाड शिवाजीनगर येथील पोलीस चौकीत गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रारच घेतलीच नाही. त्यामुळे झालेल्या मन:स्तापाने गायकवाड पोलीस ठाण्याच्या आवारातच खाली कोसळले व बेशुद्ध झाले. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत रात्रीपासून बंद सुरू केला.
नांदेड- जळगावमध्ये डेपो बंद
एसटीचालकाच्या मृत्यूनंतर राज्यभरात एसटी चालकांचे आंदोलन सुरू असून निषेधाचे हे लोण नांदेड तेसच जळगाव पर्यंत पोहोचले आहे. येथील एस.टी डेपोही आज सकाळी काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते.
https://www.dailymotion.com/video/x844qv9