व्हिडीओ हटवले, पण...
By Admin | Published: June 1, 2016 04:20 AM2016-06-01T04:20:34+5:302016-06-01T04:20:34+5:30
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारे एआयबी समूहाच्या तन्मय भट याचे ते वादग्रस्त व्हिडिओ अन्य साईटवरून हटविण्यासाठी पोलिस आटापिटा करीत आहेत
डिप्पी वांकाणी, मुंबई
ठाणे : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची खिल्ली उडविणारे एआयबी समूहाच्या तन्मय भट याचे ते वादग्रस्त व्हिडिओ अन्य साईटवरून हटविण्यासाठी पोलिस आटापिटा करीत आहेत. फेसबूकवरुन हे व्हिडिओ हटविलेही गेले आहेत. मात्र अनेक वेबसाईटवर या व्हिडिओच्या ज्या कॉपीज असून, त्या हटविण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.
पाकिस्तानचे काही हॅकर्स अशा व्हिडिओचा प्रसार वेगवेगळया वेबसाईटवरुन करण्यात अग्रेसर आहेत. भट याने पोस्ट केलेले हे व्हिडिओ नष्ट करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारी स्नॅपचॅट आणि फेसबूकशी संपर्क केला होता. भट याने पोस्ट केलेले हे व्हिडिओ आता फेसबूक आणि स्रॅपचॅटवरुन हटविण्यात आले आहेत.
अनेक वेबसाईटवर या व्हिडिओच्या कॉपीज आहेत. आमचा सोशल मीडिया लॅब आणि सायबर क्राईम सेल हे व्हिडिओ नष्ट करण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या व्हिडिओत काही आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर यांच्याकडून याबाबत तक्रार न आल्यास या प्रकरणात पुढे कशी कारवाई करायची, याचा आम्ही विचार करत आहोत.
त्यामुळे आतापर्यंत आम्ही भट यास चौकशीसाठी बोलविले नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मनसेने आपल्या स्टाईलने धडा शिकविण्याची भट यास धमकी दिली आहे. पण, आम्ही भट यास कोणतीही सुरक्षा पुरविण्यात आलेली नाही.