VIDEO : धानोरा भुसे प्रकल्प गावक-यांसाठी धोक्याची घंटा
By admin | Published: September 1, 2016 03:22 PM2016-09-01T15:22:33+5:302016-09-01T15:22:33+5:30
मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी परिसरातील चार गावांतील शेतक-यांची जमिन अधिग्रहीत करून धानोरा भुसे प्रकल्प उभारण्यात आला.
Next
>दादाराव गायकवाड / नरेश आसावा /
इंझोरी (वाशिम), दि. १ - मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी परिसरातील चार गावांतील शेतक-यांची जमिन अधिग्रहीत करून धानोरा भुसे प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पापासून शेतकºयांना म्हणावा तेवढा फायद्याचा ठरला नाहीच; परंतु या प्रकल्पाच्या भिंतीची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की भिंत फटून एखादवेळी गावच वाहून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय यासाठी ज्या गावातील शेतकºयांची जमिनी संपादीत केली. त्यापैकी धानोरा वगळता इतर गावांना या प्रकल्पाचा कवडीचाही फायदा झालेला नाही.