VIDEO - धुळ्यात मनोरुग्णाने पोलिसांची व्हॅन पेटविली
By Admin | Published: December 23, 2016 09:48 PM2016-12-23T21:48:31+5:302016-12-23T21:48:31+5:30
ऑनलाइन लोकमत धुळे, दि.23 - जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात उभी असलेली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सुमो मनोरुग्ण ...
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि.23 - जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात उभी असलेली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सुमो मनोरुग्ण मनीष भोरसकर (वय ४०) याने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली. गाडी पेटविल्यानंतर तेथून पळत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच्या बाजूस दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची एमएच १८-अेफ ०१६२ या क्रमांकाची सुमो उभी होती. याकाळात आवारात आलेल्या मनिष पुरूषोत्तम भोरसकर (वय ४० रा़शिवकुंज बिल्डींग, भिडे बाग, देवपूर, धुळे) याने बाटलीत आणलेले पेट्रोल गाडीवर टाकून काडीपेटीने ती पेटवून दिली. पेट्रोलमुळे काही सेंकदात एकदम आगीचा भडका उडाल्याने एकच धावपळ उडाली. यठिकाणी उपस्थित असलेले सहायक उपनिरीक्षक रमेश पवार व जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदेश कुलकर्णी यांनी बाहेर धाव घेतली. त्यावेळी मनिष भोरसकर तेथून पळतांना दिसला. त्याला रमेश पवार यांनी ताब्यात घेतले. तर संदेश कुलकर्णीसह इतर कर्मचाऱ्यांनी आवारातील बोअरींग सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्नीशमन दलाच्या बंबालाही पाचारण करण्यात आले. बंब आल्यानंतर दहा मिनिटात आगेवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत लॉगबुक, मंथली बुकसह सर्व गाडी जळून खाक झाली होती. त्यात ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ याबाबत चालक विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनिष भोरसकर याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात अग्नीउपद्रव व शासकीय वाहन जाळल्याप्रकरणी भादंवी कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
मनिष मानसिकदृष्या आजारी
संशयित मनिष भोरसकर याची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यावर नाशिक व पुणे येथील डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. याबाबत त्याचा चुलत भाऊ राहुल भोेरसकर याने पोलिसांना माहिती दिली. त्याच्यावर उपचार सुरू असल्याबाबतचे वैद्यकीय कागदपत्रही पोलिसांना दाखविली. मात्र याबाबत शासकीय वैद्यकीय सूत्रांचा सल्ला घेऊन त्याबाबत पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
घरी होता एकटा
मनिष याचे आई- वडील शुक्रवारी घरभरणीच्या कार्यक्रमासाठी शहादा येथे गेले होते़ त्यामुळे तो घरी एकटा होता़ त्याने काही दिवस वडापावची गाडीही लावली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विरोध, नाराजीतून जाळली गाडी
मनिष हा मला कॉमन मॅन पॅकेज मिळत नाही़ दहा वर्षापासुन अर्जफाटे करत होता़ राजकीय लोक विरोध करतात याचा राग आला म्हणून गाडी जाळली असे त्याने पोलिसांनाही सांगितले़ त्याची पोलीस प्रशासनाबाबत तक्रार नव्हती़ तक्रार असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल़ असे पोलीस अधीक्षक चैतन्या एस यांनी सांगितले़
https://www.dailymotion.com/video/x844m9w