VIDEO - धोकादायक ब्रिटिशकालिन इमारतीत डीटीएडचे विद्यार्थी घेतात शिक्षण!
By admin | Published: September 23, 2016 08:00 PM2016-09-23T20:00:23+5:302016-09-23T20:00:23+5:30
जिल्हा प्रशासन प्रशिक्षण संस्था(डीएड)ची प्रशस्त इमारत ब्रिटिशांनी बांधली असून, या इमारतीला अंदाजे दीडशे वर्ष पूर्ण झाले असून, इमारत ठिकठिकाणी जीर्ण झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 23 - जिल्हा प्रशासन प्रशिक्षण संस्था(डीएड)ची प्रशस्त इमारत ब्रिटिशांनी बांधली असून, या इमारतीला अंदाजे दीडशे वर्ष पूर्ण झाले असून, इमारत ठिकठिकाणी जीर्ण झाली आहे. भिंतींना, छताला तडे गेलेले आहेत. इमारतीचा अर्ध्या भागाची पडझड झाली असून, अर्धी इमारत शाबूत आहे. या शाबूत इमारतीमध्ये डीटीएडचे विद्यार्थी शिक्षण घेतात. जीर्ण आणि पडझड झालेल्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांसोबतच येथील शिक्षकांचे जीवन धोक्यात आले आहे. नवीन इमारत बांधण्यासंबधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. इमारत शिकस्त आणि जीण झाली असल्याचे पत्र प्रशासनाला वर्षभरापूर्वीच ब्रिटिशांनी इंग्लंडहून पाठविले. परंतु त्या पत्राची अद्यापपर्यंत प्रशासनाने दखल घेतल्याचे दिसून येत नाही.
प्राप्त माहितीनुसार ब्रिटिशांनी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीकोनातून १८८५ च्या सुमारास प्रशस्त इमारत उभारली. ही दुमजली असून, अत्यंत प्रशस्त आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी वास्तू आणि ब्रिटिशांचा एक वारसा म्हणून या इमारतीकडे पाहिले जाते. इमारतीची रचना पूर्णता ब्रिटिश पद्धतीची असून, इमारतीचे निरीक्षण केल्यास ब्रिटिशकाळाचा आभास होतो. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीकोनातून बांधलेल्या इमारतीमध्ये त्याकाळात ब्रिटिश अधिकाºयांच्या घोड्यांचे तबेले असायचे. इमारतीमध्ये भव्य सभागृह असून, त्यात ब्रिटिश अधिकाºयांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. १९९५ पासून या इमारतीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(डीटीएड) सुरू केले. एकेकाळी या इमारतीमधून हजारो विद्यार्थी शिक्षक बनून बाहेर पडले. परंतु डीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा आता कमी झाला. परंतु आजही या इमारतीमध्ये २५ ते ३0 विद्यार्थी शिक्षण घेतात. इमारत ठिकठिकाणी जीर्ण झाली असून, अनेक ठिकाणी पडझड सुद्धा झाली आहे. इमारतीच्या दुसºया मजल्यावर स्लॅबमधील लोखंडी सळई बाहेर निघालेल्या आहेत. भिंतांना तडे गेलेले आहेत. इमारत धोकादायक बनल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवितास धोका निर्माण झाली. ही बाब लक्षात जिल्हा प्रशासन प्रशिक्षण संस्थेने सुद्धा इमारत बांधणींसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
डीएड इमारत बांधकामासाठी ४ कोटींचा निधी
ब्रिटिशकालीन इमारत न पाडता, इमारतीच्या मागील जागेवर नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन प्रशिक्षण संस्थेने शासनाकडे दिला असून, शासनाने इमारतीमध्ये ४ कोटी १४ लाख रूपये मंजूर केले असून, लवकरच बांधकामाला सुरूवात होण्याची शक्यता असल्याचे प्राचार्य डॉ. राम सोनारे यांनी सांगितले.