Video: एकनाथ शिंदे पुन्हा रिक्षा चालक बनले; नातू बनला प्रवासी, प्रताप सरनाईकही सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:47 IST2025-01-12T16:44:45+5:302025-01-12T16:47:45+5:30
एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातही आज त्या दोन गाड्या आहेत. यात एक रिक्षा आणि महिंद्रा अरमाडा ग्रैंड एसयुव्ही आहे.

Video: एकनाथ शिंदे पुन्हा रिक्षा चालक बनले; नातू बनला प्रवासी, प्रताप सरनाईकही सोबत
राजकारणात येण्यापूर्वी रिक्षाचालक असलेले उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात रिक्षा चालविण्याचा जुन्या दिवसांचा आनंद घेतला. ठाण्यात ऑटोफेस्ट सुरु झाला आहे. यामध्ये व्हिंटेज कारसह अनेक प्रकारची वाहने आली आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंद आणि मंत्री प्रताप सरनाईक व उद्योगपती गौतम सिंघानिया आले होते.
एकनाथ शिंदे यांनी सुपरबाईकही चालविली. एकनाथ शिंदेंचा रिक्षा चालवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हा मुद्दा तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून केलेल्या बंडावेळी चर्चेत आला होता.
या प्रदर्शनात ५० वर्षांहून अधिक जुन्या सर्व विंटेज कार आणि मोटारसायकली ठेवण्यात आल्या आहेत. ३० ते ५० वर्षे जुन्या सर्व क्लासिक कार आणि मोटारसायकली तसेच फेरारी, लॅम्बोर्गिनी, मॅकलरेन इत्यादी सर्व सुपर कार याठिकाणी आहेत.
एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातही आज त्या दोन गाड्या आहेत. यात एक रिक्षा आणि महिंद्रा अरमाडा ग्रैंड एसयुव्ही आहे. याची माहिती त्यांनी निवडणुक शपथपत्रात दिली होती.
#WATCH | Maharashtra Deputy CM Eknath Shinde rides a bike and an auto at Auto Fest 2025 in Thane
— ANI (@ANI) January 12, 2025
(Source: Deputy CM Eknath Shinde's PRO) pic.twitter.com/HgrbjUC1Ah