VIDEO : बालहौशी गणेश मंडळाकडून पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 02:05 PM2016-09-12T14:05:53+5:302016-09-12T14:19:11+5:30

कारंजातील बाल हौशी गणेश मंडळाने सलग 10 वर्षापासून पर्यावरण पुरक गणेशाची स्थापना करून जिल्हयातील गणेश मंडळासमोर आदर्श निर्माण केला आहे.

VIDEO: Establishment of Ganesh Mandal for Environmental Supplement by Ganesh Board | VIDEO : बालहौशी गणेश मंडळाकडून पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना

VIDEO : बालहौशी गणेश मंडळाकडून पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना

Next
प्रफुल बानगांवकर, ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड ( वाशिम), दि. १२ - पर्यावरणाचा -हास होउ नये याकरीता अनेक समाजसेवी सघटना काम करीत असतांना कारंजातील बाल हौशी गणेश मंडळाने सलग 10 वर्षापासून पर्यावरण पुरक गणेशाची स्थापना करून जिल्हयातील गणेश मंडळासमोर आदर्श निर्माण केला आहे. 
पर्यावरण रक्षणासाठी शासन स्तराहून व्यापक स्थळावर जनजागृती सुरू आहे. या अधिही काही गणेश मंडळानी स्वताःहूनच पर्यावरण वाचविण्यासाठी संदेश देत समाजाला आवाहन केले. तर कारंजा येथील बाल हौसी गणेश मंडळ गेल्या दहा वर्षापासून विशिष्ट शैलीतील लोभस व आकर्षक गणेश मुर्ती आपल्या घरगृती साहीत्यातून निर्माण करून भाविकांचे लक्ष वेधले यावर्षी निव्वल आपल्या शेतातील माती पासून गणेश मुर्ती तयार करून या मंडळाने संपुर्ण मुर्तीवर कवळया व्दारे साज चढविले आहे. हे पाहुन प्रत्येक भाविक श्रीच्या दर्शनाने तृप्त होत असून मंडळाच्या या पर्यावरण पुरक उपक्रमाची स्तुस्ती सर्वाकडून होत आहे. मुर्तीकार अमित क-हे व मंडळाचे अध्यक्ष आकास कन्हे यांच्यासह सर्व सदस्य यांनी केेलेल्या मेहनतीचे कौतूक करीत भाविक श्रीचे दर्शन घेत आहे. या मंडळाने 2008 साली चमणा-या मोतीपासून, 2009 मध्ये डांयमड खडयाची गणेशमुर्ती, 2010 मध्ये आपल्या शेतातील धान्यापासून गणेशमुर्ती, 2011 मध्ये पुजेच्या सहीत्यापासून गणेश मुर्ती, 2012 मध्ये नारळापासून 2013 मध्ये मोरपीसापासून गणेशमुर्ती, 2014 मध्ये वाळू शिल्पापासून गणेशमुर्ती, 2015 मध्ये पेन्शील पासून  व यावर्षी कवळया पासून तयार केलेली गणेश मुर्ती असे सलग 10 वर्षापासून बाल हैासी गणेश मंडळ भाजीबाजार हे पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करत असून मंडळ दरवर्षी या मुर्ती संग्रहीत करून ठेवत आहे. या मंडळाचा आदर्श ईतर गणेश मंडळानी घ्यावा व  प्रशासनाने मंडळाच्या उपक्रमाची दखल घेणे गरजेचे आहे. 
 
सोन्याला आकार देत सुर्वणकार अमित क-हे यांना गणेश मुर्ती बनविण्याचा छंद 
व्यवसायाने सोनार असतांना सुध्दा अमित क-हे गेल्या अनेक वर्षापासून गणेश मुर्ती तयार करीत असून त्यांच्या कुंटुबात वर्डीलोपार्जीत श्री गणेशजीची मुर्ती बनविण्याचा छंद जोपासल्या जातो. स्वतांच्या मंडळाकरीता स्वतांच गणेश मुर्ती तयार करून पर्यावरण वाचविण्यासाठी दरवर्षी वेगवेगळया साहीत्यातून श्रीना आकार देत मुर्तीकार अमित क-हे आपल्या कलेची आवठन सर्व भाविकांना करून देतात.
 
                         

Web Title: VIDEO: Establishment of Ganesh Mandal for Environmental Supplement by Ganesh Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.