VIDEO : अन् जन्माच्या पाचव्या दिवशीच तो बनला पॅनकार्डधारक

By Admin | Published: March 2, 2017 03:53 PM2017-03-02T15:53:11+5:302017-03-02T16:12:46+5:30

ऑनलाइन लोकमत   कोल्हापूर, दि. 2 -  नोटाबंदीचा परिणाम आणि जनतेतून वाढलेली जागरूकता या पार्श्वभूमीवर पॅन कार्डची (पर्मनंट अकाऊंट ...

VIDEO: On the fifth day of birth, it became a PAN card holder | VIDEO : अन् जन्माच्या पाचव्या दिवशीच तो बनला पॅनकार्डधारक

VIDEO : अन् जन्माच्या पाचव्या दिवशीच तो बनला पॅनकार्डधारक

Next

ऑनलाइन लोकमत  

कोल्हापूर, दि. 2 -  नोटाबंदीचा परिणाम आणि जनतेतून वाढलेली जागरूकता या पार्श्वभूमीवर पॅन कार्डची (पर्मनंट अकाऊंट नंबर) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोल्हापुरातील अमोल शिशुपाल पाटील यांनी त्यांच्या अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बालकाचेही पॅन कार्ड काढले आहे. हे पॅन कार्ड त्यांना आयकर विभागाकडून प्राप्त झाले. 
 
स्वराज अमोल पाटील असे या नवजात बालकाचे नाव आहे. यापूर्वी बिहार येथील एका बालिकेचे पॅन कार्ड पाचव्या दिवशी काढले होते. त्यानंतर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले कमीत कमी वयाच्या व्यक्तीचे हे पॅन कार्ड आहे. शुक्रवार पेठ येथील अमोल पाटील हे कर सल्लागार आहेत. पहिल्या मुलीनंतर ९ जानेवारी २०१७ रोजी त्यांच्या पत्नीने  रायबाग (जि. बेळगाव) येथील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला.  
 
यानंतर त्यांनी मुलाच्या जन्मानंतर चौथ्या दिवशी खानापूर तहसीलदार कार्यालयातून स्वराज अमोल पाटील नावाचा दाखला काढला व पाचव्या दिवशी स्वराजचा जन्म दाखला, त्याचे दोन फोटो, आपले आधार कार्ड व पॅन कार्ड अशी कागदपत्रे प्राप्तिकर विभागात दिली. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वराजचे पॅन कार्ड त्यांच्या घरी पोस्टाने आले. आयकर भरण्यासाठी, एलआयसी, पासपोर्ट व ओळखीचा पुराव्यासाठी या पॅन कार्डचा उपयोग होतो.
 
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केल्यानंतर बँक अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयात पॅन कार्ड सक्तीचे केले आहे. या पॅन कार्डमुळे सरकारला देशातील कोणत्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे, हे समजू शकणार आहे. त्यामुळे आधार कार्डबरोबर पॅन कार्ड ही सरकारने सक्तीचे केले आहे. या पॅन कार्डचा निश्चितच फायदा होणार  आहे.
 
याबाबत अमोल पाटील म्हणाले, नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने पॅन कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे जन्मानंतर मुलाचे पॅन कार्ड तत्काळ काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार देशभरात किती बालकांची पॅन कार्ड काढली आहेत, याची माहिती इंटरनेटवरून घेतली. त्यावेळी बिहारमधील एका बालिकेचे पॅन कार्ड काढल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मला मुलगा झाल्यावर पाचव्या दिवशी त्याचे पॅन कार्ड काढले. परिणामी महाराष्ट्रातील हे पहिलेच पॅन कार्ड ठरले.
 
पॅन कार्ड काढल्यामुळे मुलाच्या नावे आतापासून नियोजनपूर्वक गुंतवणूक करता येते व त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला व पाल्याला होतो. तसेच करबचतही करता येते.-अमोलदादा पाटील, कोल्हापूर.

https://www.dailymotion.com/video/x844tdf

Web Title: VIDEO: On the fifth day of birth, it became a PAN card holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.