VIDEO - तरसोद फाट्याजवळ शॉर्ट सर्किटमुळे लागली गोडावूनला आग
By admin | Published: October 26, 2016 12:13 AM2016-10-26T00:13:58+5:302016-10-26T00:13:58+5:30
राष्ट्रीय महामार्गालगत तरसोद फाट्याजवळ असलेल्या एका गोडावूनला मंगळवारी रात्री आठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 26 - राष्ट्रीय महामार्गालगत तरसोद फाट्याजवळ असलेल्या एका गोडावूनला मंगळवारी रात्री आठ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात दोन कोटी रुपयांचे टायर, एक कोटी रुपयांचे सौंदर्य प्रसाधने जळून खाक झाले. गोडावूनमधील पत्रे, शटर यांचीही राख झाली. तीन तास आगीचे तांडव सुरूच होते. घटनेची माहिती कळवूनही अग्निशमन दलाचे बंब तब्बल एक तासाने दाखल झाले.
जळगाव येथील प्रितेश वेद यांच्या मालकीचे तरसोद फाट्याजवळ जसोदा एण्टरप्रायझेस नावाचे गोदाम आहेत. या आवारात तीन गोदाम आहेत. त्यातील दोन मणिलाल मांगेलाल पारेख (रा.पारेख नगर, रामानंद जळगाव) यांनी भाड्याने घेतले आहेत. एका गोडावूनमध्ये सिएट कंपनीचे दोन कोटी रुपये किमतीचे टायर तर दुसऱ्या गोडावूनमध्ये ब्युटी पार्लरसाठी लागणारे एक कोटी रुपये किमतीचे सौंदर्य प्रसाधने आहेत. तर शेजारीच दवाखान्यांमध्ये लागणाऱ्या आॅक्सीजन गॅसचे गोडावून आहे. अचानक आग लागल्याने मोठ्या ज्वाळा आकाशाकडे झेपावत होत्या. अग्निशमन दल, जैन इरिगेशन व भुसावळ येथील बंबांनी आग विझविली. आग वेळीच आटोक्यात आल्याने शेजारीच असलेल्या आॅक्सीजनच्या गोदामाला आग लागली नाही. त्यामुळे अनर्थ टळला.