VIDEO - दर्ग्यावरची चादर फडफडली, श्वासोच्छवास घेतल्याचा दावा

By admin | Published: October 12, 2016 07:29 PM2016-10-12T19:29:49+5:302016-10-12T19:29:49+5:30

सिसा-बोंदरखेड येथील हजरत शामनशाहवली बाबांच्या दर्ग्या वरील चादर फडफडत होती त्यामुळे दर्ग्यान ने श्वाच्छोश्वास घेतल्याचा दावा १० आॅक्टोबरला भाविकांनी केला.

VIDEO - Flat sheet lit, breath-taking claim | VIDEO - दर्ग्यावरची चादर फडफडली, श्वासोच्छवास घेतल्याचा दावा

VIDEO - दर्ग्यावरची चादर फडफडली, श्वासोच्छवास घेतल्याचा दावा

Next

- आगाखान पठाण/ बाभुळगाव जहॉगीर/ऑनलाइन लोकमत

 अकोला, दि.12 - सिसा-बोंदरखेड येथील हजरत शामनशाहवली बाबांच्या दर्ग्या वरील चादर फडफडत होती त्यामुळे दर्ग्यान ने श्वाच्छोश्वास घेतल्याचा दावा १० आॅक्टोबरला भाविकांनी केला. असून याबाबत एक व्हिडीओ क्लीपही सादर सध्या व्हायरल झाली आहे.या क्लीपमध्ये दर्गाहवरील चादरीमधून स्पंदने होत असल्याचे दिसत आहे.
या घटनेची माहिती मिळताच समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्ग्याची स्पंदने का, झाली याचे कारण मात्र, समजु शकले नाही. अंनिसे भाविकांचा हा दावा फेटाळला असून कुठल्याही कारणाशिवाय घटना घडत नसल्याचे म्हटले आहे.
सिसा-बोंदरखेड येथील हजरत शामनशाहवली बाबांच्या दर्ग्याचे एक भाविक १० आॅक्टोबरला दर्शन घेत होता. त्यावेळी त्याला दर्ग्यामधून स्पंदने होत असल्याचे आढळले. त्याने ही बाब तेथे उपस्थित मौलवींना सांगितली. त्यानंतर ही गोष्ट परिसरात परसरल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. खात्री करण्यासाठी दर्ग्यामध्ये फक्त पाच-सहा जणांना प्रवेश देण्यात आले. हजरत शामनशाहवली बाबांच्या समाधीवर असलेल्या फुलांची चादर व गलेबच्या खाली काहीतरी असेल, अशी शंका उपस्थितांना आल्याने त्यांनी एक एक करून फुलांची चादर व गलेब काढले. परंतु त्यात काही निघाले नाही,असा दावा प्रत्यक्षदर्शी भाविकाने केला. यानंतर उपस्थितांनी या दर्गाहमध्ये धार्मिक विधीचे पठण केले. हफीज अफसर साहब यांनी समाधीस्थळी अपवित्र मनाने कोणत्या तरी भाविकाने प्रवेश केला असल्यानेच असा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. अनिसंने मात्र,हा दावा फेटाळला असून कुठलीही घटना ही कारणांशिवाय घडत नसल्याचे सांगितले.

बाबांची समाधी धडकत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहीले. माझ्या समक्ष समाधीवरील फुलांची चादर व गलेब काढण्यात आले होते. परंतु यात काहीही निघाले नाही.
- अफरोज खान पठाण
प्रत्यक्षदर्शी भाविक

कारणाशिवाय कुठलीही घटना घडत नाही. चमत्कार हा प्रकारच अस्तित्वात नाही. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते ते कारण शोधण्याची गरज आहे.
- अशोक घाटे
राज्य सहसंघटक, अंनिस

Web Title: VIDEO - Flat sheet lit, breath-taking claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.