VIDEO - मुंबईच्या माजी महापौरांना २६ वर्षांपूर्वी चोरी झालेली चेन परत मिळाली
By admin | Published: September 21, 2016 02:32 PM2016-09-21T14:32:47+5:302016-09-21T14:58:26+5:30
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका डॉ.शुभा राऊळ यांची २६ वर्षापूर्वी चोरी झालेली सोन्याची चेन त्यांना परत मिळाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका डॉ.शुभा राऊळ यांची २६ वर्षापूर्वी चोरी झालेली सोन्याची चेन त्यांना परत मिळाली आहे. शुभा राऊळ यांनी यासाठी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
डॉ.शुभा राऊळ वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालया समोरच्या बस थांब्यावर उभ्या असताना त्यांच्या सोन्याच्या चेनची चोरी झाली होती. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर टिळकनगर पोलिसांनी विक्रोळीच्या ३४नंबरच्या कोर्टात डॉ.शुभा राऊळ यांची चोरी झालेली चेन त्यांच्याकडे सुपूर्द केली.
मुंबईत दिवसाढवळया अनेक सोन्याच्या दागिन्यांची चोरी होते. अभावानेच लोकांना त्यांचे चोरीला गेलेले दागिने परत मिळतात. शुभा राऊळ मात्र नशीबवान ठरल्या.
२००७ ते २००९ या दोन वर्षात त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले होते. दहीसर येथे रहाणा-या शुभा राऊळ यांचे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याबरोबर तीव्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी २०१४ विधानसभा निवडणुकीच्यावेळी मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या पुन्हा शिवसेनेमध्ये परतल्या.