VIDEO: बिबट्याचा गावात मुक्तसंचार
By admin | Published: August 13, 2016 07:26 PM2016-08-13T19:26:53+5:302016-08-13T19:29:31+5:30
तीन महिन्यापुर्वी तालुक्यातील वडी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला लागुन असलेल्या पाईप फॅक्टरी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे
Next
>- सुहास वाघमारे / ऑनलाइन लोकमत
तीन महीन्यांपासून पाईप फॅक्टरीत दर्शन
नांदुरा (जि.बुलडाणा), दि. 13 - तीन महिन्यापुर्वी तालुक्यातील वडी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला लागुन असलेल्या पाईप फॅक्टरी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
यावर्षी ८ मे व ३ जून दरम्यान वडी शिवारातील पाईप फॅक्टरी परिसरात बिबट्या दिसून आल्याने फॅक्टरी परिसरातील मजूर व शेतकरी यांच्यात दहशत निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने फोटोसह बातमी प्रकाशित केल्यानंतर वनविभागाचा चमु येथे दाखल झाली. प्रत्येकवेळी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न वनविभागाने केला. मात्र, काही दिवसातच बिबट्याने परिसर सोडला असे सांगुन वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्यांची कार्यवाही थांबवली.
दरम्यान, आता गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार पाईप फॅक्टरी परिसरातील शेतात व फॅक्टरी परिसरातील शेतात व फॅक्टरीत आहे. हा बिबट्या शेतकºयांना दिसुन आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले. यामधील काही शेतकºयांनी नगरसेवक सचिन नांदुरकर व अनिल सपकाळ यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ फॅक्टरी परिसरात जावुन पाहणी केली असता पुर्वीप्रमाणे बिबट्या हा पाईप फॅक्टरीतील पाईपवर बसलेला दिसून आला. नगरसेवक अनिल सपकाळ यांनी बिबट्याचा मुक्त संचार कॅमेराबंद केला व व्हिडीओ चित्रीकरण केले.
मागील तीन महिन्यांपासून बिबट्याचा परिसरात मुक्तसंचार असून परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. या बिबट्याला वनविभागाने पकडून जंगलात सोडावे, अशी परिसरातील शेतकºयांची आहे.
वनविभागाला दिसेना बिबट्या!
पाईप फॅक्टरी परिसरातील बिबट्याचा मुक्तसंचार शेतकºयांना दिसतो. त्याचे छायाचित्र व आता तर व्हिडीओ सुध्दा उपलब्ध आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी यांना दिसतच नाही. त्यामुळे वनविभागाची अनास्था वारंवार समोर येत आहे.
ही पिकनिक जीवावर बेतणारी !
बिबट्या पाईप फॅक्टरी परिसरातील मुक्तसंचार हा नांदुरा शहरातील वन्यजीव प्रेमी व पर्यावरण प्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. दररोज बिबट्याला पाहण्यासाठी काही तरूण धाडस करून पाईप फॅक्टरी परिसर पिंजून काढतात. जिवंत बिबट्या पाहण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय पार्कमध्ये जाण्याची गरज नाही. ‘कशाला जाता तडोबा..’ आता मेसेज यापुर्वीच सोशल मिडीयात परिसरात व्हायरल झाला होता. मात्र चिडलेल्या बिबट्याने हल्ला केला. तर ही पिकनिक जीवावर बेतणारी ठरू शकते.