Video: उन्हाळ्यात ‘अमृता"चे मोफत वाटप
By Admin | Published: May 24, 2017 08:41 PM2017-05-24T20:41:09+5:302017-05-24T20:41:09+5:30
गिरीश राऊत / ऑनलाइन लोकमत खामगाव(बुलडाणा), दि. 24 - असह्य होणा-या उन्हाळ्यात आवश्यक वाटणा-या व शरीराला ‘अमृत’ ठरणा-या ताकाचे ...
गिरीश राऊत / ऑनलाइन लोकमत
खामगाव(बुलडाणा), दि. 24 - असह्य होणा-या उन्हाळ्यात आवश्यक वाटणा-या व शरीराला ‘अमृत’ ठरणा-या ताकाचे मोफत वाटप येथील मानकुंवरबेन लालचंदजी दोशी सार्वजनिक छांच वितरण या सेवाभावी संस्थेकडून उन्हाळाभर करण्यात येते. १९७६ साली हा उपक्रम सुरु करताना १० लिटर ताकाचे वाटप दरदिवशी करण्यात येत होते. मात्र गेल्या ३१ वर्षांत यामध्ये लाभार्थींच्या संख्येत वाढ झाल्याने हा आकडा आता ८०० लिटरवर पोहोचला आहे.
शहरातील रहिवासी मानकुंवरबेन लालचंदजी दोशी ह्या मध्य प्रदेशातील इंदोर येथे उन्हाळ्यात काही कामानिमित्त गेल्या असता तेथे मोफत ताक वाटपाचा उपक्रम राबविल्या जात असल्याचे त्यांना दिसून आले. याच प्रेरणेतून त्यांनी हा उपक्रम खामगाव येथे सुरु करण्याचे ठरविले व आपल्या परिने सुरुवातीला दररोज १० लिटर ताकाचे मोफत वितरण त्यांनी सन १९७६ साली सुरु केले होते.
यानंतर या उपक्रमाचे महत्व पाहता शहरातील इतर दानदाते सुध्दा या उपक्रमाशी जोडले गेले. आजरोजी या उपक्रमाला अखंडित ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. दुधाची टंचाई पाहता ताक वाटपात खंड पडू नये यासाठी संस्थेच्या पदाधिकाºयांकडून नामांकित कंपनीची दूध पावडर आणण्यात येवून दही लावल्या जाते व त्यानंतर ताक तयार करण्यात येते. उन्हाळ्यात वाढते तापमानात शरीराला ताकाची आवश्यकता असताना अशांसाठी हे मोफत ताक ‘अमृत’ समान ठरत आहे. आजरोजी मोफत ताक वितरणासाठी ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष महेंद्रभाई शहा, उपाध्यक्ष प्रफुल्लभाई कमानी, सचिव हसमुखभाई कमानी, कोषाध्यक्ष भिकुभाई संघराजका, सदस्य सर्वश्री नगीनभाई मेहता, जगदिशभाई संघराजका, अशोक कमानी, किर्तीभाई खिलोशिया, कपिलभाई दोशी, रतनलाल सुराणा, अॅड.व्हि.वाय.देशमुख आदींसोबतच नामदेवराव माने हे परिश्रम घेत आहेत.
कायमस्वरुपी व्यवस्था-
३१ वर्षांपासून सुरु असलेला हा उपक्रम अखंडितपणे सुरु राहावा, यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था म्हणून दानदात्यांकडून प्राप्त झालेला मदतनिधी बँकेमध्ये डिपॉझिट करण्यात आला आहे. यावर मिळणाºया व्याजातून हा खर्च भागविल्या जातो. मात्र दरवर्षी लाभार्थी संख्या वाढतीच आहे.
https://www.dailymotion.com/video/x844zgx