VIDEO - मुंबईकरांचा पेंग्विन पाहण्याचा मार्ग मोकळा
By Admin | Published: March 17, 2017 10:45 PM2017-03-17T22:45:08+5:302017-03-17T22:45:08+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 17 - मागच्या काही महिन्यांपासून राजकीय मुद्दा बनलेल्या पेंग्विन कक्षाचा लोकार्पण सोहळा अखेर आज पार ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मागच्या काही महिन्यांपासून राजकीय मुद्दा बनलेल्या पेंग्विन कक्षाचा लोकार्पण सोहळा अखेर आज पार पाडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पेंग्विन कक्षाचे उदघाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी पारदर्शकतेच्या मुद्यावरुन भाजपावर निशाणा साधला. राणीच्या बागेत पारदर्श काचेतून पेंग्विन पाहता येतील. आमची काच पारदर्शक आहे असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
आतापर्यंत फक्त टीव्हीवरुन पेंग्विन पक्षी पाहणा-या मुंबईकरांना प्रत्यक्ष डोळयासमोर पेंग्विन पाहता येतील. दरम्यान आज झालेल्या उदघाटनाच्या कार्यक्रमावर भाजपाने बहिष्कार टाकला. पेंग्विन पाहण्य़ासाठी एक एप्रिलपासून शुल्क लागू होईल. प्रौढांसाठी 100 रुपये तर, लहान मुलांसाठी 50 रुपये दर प्रस्तावित आहे.
मुंबई महापालिकेने कोटयावधी रुपये खर्चून परदेशातून हे पेंग्विन पक्षी इथे आणले आहेत. त्यांच्या देखभालीचा खर्चही मोठा असल्याने महापालिकेतील विरोधी पक्षांनी या पेंग्विन आणण्याच्या निर्णयावर टीका चालवली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844udr